Home Social अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या चंद्रपूरच्या वैजयंती विकास गहुकर यांचे कार्य उल्लेखनीय...

अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या चंद्रपूरच्या वैजयंती विकास गहुकर यांचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद! 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      विदर्भातील सुपरिचित कवयित्री वैजयंती विकास गहुकर ह्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवाशी त्या एक योगशिक्षिका देखील आहे. त्यांच्या क्लाॅसचे नाव वैजयंती फिटनेस योगा क्लास आहे. 

        सामाजिक कार्यात त्यांना विशेष रुची असून त्या पर्यावरण समिती व सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या एक जेष्ठ सदस्य आहेत.

       सहज सुचलंच्या काव्यकुंज गृपवर त्यांच्या नियमित कविता येत असतात.त्यांना महाराष्ट्रातील विविध संस्थेच्या वतीने आजपर्यंत योगा , नृत्य व उत्कृष्ट कविता लिहिल्या बद्दल 200 च्यावर सन्मान पुरस्कार बहाल झाले आहे. तद्वतच त्यांनी 500 कविता तयार केलेल्या असून प्रेम,विरह, निसर्ग, अंधश्रद्धा, अभंग, शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्यावर त्या आधारीत आहेत.

         जीवनातील प्रत्येक विषयाला धरून त्यांनी कविता लेखन केले हे विशेष! वैजयंती गहुकर ह्या योगशिक्षिका असून त्यांना आयुर्वेदाचे ज्ञान आहे.त्यांनी बऱ्याच लोकांना रोगमुक्त केलेले आहे. 

       त्यांचा मुलगा 17 वर्षाचा असताना त्याचे दोन्ही हातपाय लूज झाले होते .त्याला त्यांनी कोणताही ॲलोपॅथिक दवाखाना न नेता घरीच दुरुस्त केले.तो युनिव्हर्सिटी टॉपर आहे .सध्या तो जॉब करीत आहे.

       त्या वात विकार ,लकवा व स्किन प्रॉब्लेमवर स्वतःच घरी तेल तयार करतात.त्यांचे योगा क्लाॅसेस ऑनलाईन व ऑफलाइन असते.जागतिक योगा डे चे कार्यक्रम त्या गत चार वर्षांपासून घेत आहे.

        चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी व आ.किशोर जोरगेवार यांच्याकडून त्यांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहे.

         आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देखील नृत्य कलेत त्यांना पुरस्कार मिळाला आहे. 

       त्यांचे योगाचे वैजयंती फिटनेस हे यू ट्यूब चॅनल असून त्याचे 57 हजार सबस्क्राॅयबर असल्याचे त्यांनी सांगितले.कवयित्री गहुकर यांचे कवितेचे यूट्यूब चैनल वैजूच्या कविता या नावाने सुरू आहे.अंदाजे 400 सबस्क्राईब झालेले आहे.योग गुरु श्रीरामदेव बाबा यांची त्यांनी मध्यंतरी भेट घेतली होती.अस्थमा ,बीपी या रोगांवर आपण मात केलेली आहे. हे सर्व योगामुळे साध्य झाले असल्याचे त्या सांगतात.

       करोना काळात त्यांनी स्वतः 1000 च्या वर माक्स तयार करून विविध ठिकाणी ते वाटप केलेले आहे.शहरातील वृक्षारोपन, स्वच्छता अभियान अश्या विविध प्रकारच्या उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे.

        आदर्श योग शिक्षिका प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार 2024(मुंबई) गडचिरोली येथील बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. यावर्षी त्यांना राज्यस्तरीय काव्य रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

त्यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.