ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : आषाढी एकादशी निमित्त संत शिरोमणी नरहरी सोनार विठ्ठल रखुमाई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसादामध्ये साबुदाणा आणि मसाला भाताचे वाटप करण्यात आले. या प्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाप्रसंगी मंदिराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आज रविवार सकाळपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी जमली होती सकाळी दहा वाजता पूजा अर्चना करून बारा वाजता गोपाल काला व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमले होते.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात साकोली-सेंदुरवाफा शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पक्षीय नेते माजी नगरसेवक व मोठ्या संख्येने भक्त पूजेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी भारतीय सोनार समाज शाखा साकोलीच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.



