Home Political भंडारा जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर… — शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी पद्माकर...

भंडारा जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर… — शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी पद्माकर बावनकर तर साकोली शहर प्रमुख पदी नरेंद्र वाडीभस्मे…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

  दखल न्यूज भारत

साकोली : पक्षाची बांधणी करण्याकरिता हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सूचनेवरून भंडारा जिल्हा शिवसेना कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

       यामध्ये भंडारा जिल्हा प्रमुख पदी पद्माकर बावनकर ,उपजिल्हाप्रमुख वेणुधर( बंडूभाऊ) शेंडे, जिल्हा संघटक ताराचंद (बाळा) शिवणकर, जिल्हा कार्यालय प्रमुख महेश भदाडे, साकोली तालुका प्रमुख राधेशाम मुंगमोडे, साकोली उपतालुकाप्रमुख सचिन घोनमोडे,लाखनी तालुकाप्रमुख उमेश गायधनी, साकोली -शेंदुरवाफा शहरप्रमुख नरेंद्र वाडीभस्मे, युवा सेना साकोली तालुकाप्रमुख पुष्कर करंजेकर, युवा सेना साकोली शहर प्रमुख विवेक काशीवर, वाहतूक सेना साकोली तालुका सुमित लंजे, उपतालुका लाखनी विनायक शेंडे, युवा सेना तालुका लाखनी अमन निर्वाण,लाखांदुर शहर प्रमुख श्रीकांत रणदिवे, युवा सेना तालुका लाखांदूर जितेंद्र ढोरे, युवा सेनाउप तालुका लाखांदूर यश खत्री यांची नियुक्ती करण्यात आली.