Home देशविदेश “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” हा नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना लगाम लावणारा किंवा नियंत्रित...

“महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” हा नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना लगाम लावणारा किंवा नियंत्रित करणारा असेल तर असा कायदा राज्य सरकारला करताच येत नाही… — केंद्र सरकारलाही असा कायदा करण्याचा अधिकार नाही… — महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या विरोधात ९० टक्के आक्षेप असल्याचे जाणकारांचे मत…. — केराच्या टोपलीत,”महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा,टाकण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जनता तयार…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातंर्गत नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करुन ठेवले आहे.

         “केंद्र सरकारला आणि भारतातील राज्य सरकारे यांना,नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना आणि विशेष अधिकारांना नियंत्रित करणारा वेगळ्या पद्धतीचा कायदा करता येत नाही.

         यामुळे ,”महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम, बहुमताच्या जोरावर महाराष्ट्र विधानमंडळात व विधानपरिषदेत पारीत करुन सुध्दा महाराष्ट्र राज्यातील जनतेला,”या बेकायदेशीर कायद्याला अनुसरून अळचणीत आणण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न किंवा जनविरोधी त्यांचा मतलबी छुप्पा एजंडा कधीच यशस्वी होवू शकत नाही…

          नागरिकांच्या मुलभूत तथा विशेष अधिकारांना नाकारणारा लोक विरोध कायदा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अस्तित्वात आणला तर,भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला असा कायदा रद्द करण्याचे अधिकार आहेत…

        तद्वतच जनविरोधी आरएसएस विचारधारेंचे,जनविरोधी भांडवलदार विचारांचे व जनविरोधी ब्राह्मण वादांचे हित साधतांना लोकशाहीचे दमन करण्यासाठी भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष अति उत्साही किंवा अति उतावीळ असतील तर महाराष्ट्र राज्यातील जनता त्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचे स्पष्ट आहे..

       महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हा नागरिकांच्या अधिकारांना दडपशाहीचा कायदा आहे असे जाणकारांचे मते आहेत.

       यामुळेचे १३ हजार आक्षेप महाराष्ट्र सरकार कडे आलेले आहेत.या १३ हजार आक्षेपा पैकी ९० टक्के विचारवंतांनी आणि तज्ञांनी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियमाचा विरोध केला आहे.

        तसेच महाराष्ट्र राज्यातील तज्ञ व अभ्यासू नागरिकांचे म्हणणे आहे की,आरएसएस-भाजपाचे जबाबदार व्यक्ती आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे खोटे बोलणारे आहेत.त्यांनी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणाला आहे असे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.

       महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते आणि आरएसएसचे विशेष पदाधिकारी,भारतातील भांडवलदार,देशातील ब्राह्मणवादी एवढे घाबरले आहेत की,”महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम,कायद्यांतर्गत सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक करु इच्छितात असा आरोपही अभ्यासू नागरिकांचा आहे…

        जनविरोधी आरएसएस विचारधारेचा विरोध करणारे जाणकार नागरिक हे अर्बन नक्षल वाटतात.याचबरोबर आरएसएस विचारधारेच्या विरोधातला कोणताही एजंडा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना देश विधातक वाटतो आहे.म्हणूणच महाराष्ट्र सत्ताधारी यांना महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सुरक्षासाठी कार्य व काम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी,तज्ञ,अभ्यासू हे अर्बन नक्षल वाटतात हे बरोबर आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील अभ्यासू नागरिकांचा,महाराष्ट्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना आहे.

       महाराष्ट्र राज्यातील अभ्यासू नागरिकांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हे बेकायदेशीर संघटना असलेल्या आरएसएसचा अड्डा व पिल्लू आहे.

        दंगा करुन,मस्ती करुन हा कायदा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या व विधानपरिषदेच्या सभागृहात पारीत झाला तरी त्या कायद्याला केराच्या टोपलीत टाकायला महाराष्ट्र राज्यातील नागरिक सक्षम आहेत व या कायद्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तथा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेला (रिट याचीकेला) अनुसरून आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नागरिक तयार आहेत.

         जनसुरक्षा कायदा हा सरकार सुरक्षा कायदा असल्याने त्यांच्या विरोधात कोणीही बोलू नये व लोकशाही शंभर टक्के संपवावी या हेतूने हा कायदा आणला असल्याचे दिसून येते आहे…

         विरोधकांना संपविण्यासाठी अशा कायद्याचा सर्रास उपयोग केला जातो आहे हे भारतीय नागरिकांनी अनुभवले आहे.आता उरल्यासुरल्या अभ्यासू व लोक हितासाठी संघर्ष करणाऱ्या विविध संघटनांच्या,विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना संपवून टाकण्याचे छडयंत्रकारी नियोजन या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारचे दिसते आहे,असाही आरोप विविध कायदा तज्ञांकडून पुढे आलेला आहे.

        भांडवलदार आणि सरकार यांचे घनिष्ठ संबंध आहेत.भांडवलदारांचे आणि त्यांच्या जवळील संघटनांचे हित जपण्यासाठी व महाराष्ट्र राज्यातील १४ कोटी लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम आणल्या जात असेल तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची योग्य भाषा सत्ताधाऱ्यांना कळत नाही असेच म्हणावे लागेल.

        या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी बधीर झाले असतील तर हे त्यांच्यासाठी घातक ठरणारे आहे.कारण भांडवलदारांना शेतकऱ्यांच्या जमिनी व सरकारी जागा देण्याचा मुख्य उद्देश सुध्दा या कायद्याचा आहे अशी ओरड महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची आहे.

      जनजागृती करण्याला,शासनाच्या अयोग्य धोरणाची नागरिकांना माहिती देण्याला हा कायदा विरोध करतो आहे.असे केल्यास संबंधितांना हा कायदा गुन्हेगार ठरवतो आहे.

         महाराष्ट्र सरकारने आणलेले हे विधेयक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं अनेक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणत आहेत. यामुळे सरकारला अमर्याद अधिकार मिळतील आणि ते विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी याचा वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

      महाराष्ट्रात सध्या “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” या कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.2024 मध्ये जेव्हा महायुती सरकारने हे विधेयक पहिल्यांदा आणलं होतं,तेव्हा त्याला खूप विरोध झाला होता आणि त्यामुळे ते मंजूर होऊ शकलं नव्हतं.पण आता राज्यात महायुतीकडे बहुमत असल्यामुळे सरकारने पुन्हा एकदा हे विधेयक 2025 च्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात सादर केलं आहे.

      महसूलमंत्री तथा विशेष जनसुरक्षा विधेयक समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हे विधेयक पुढील छाननीसाठी पाठवण्यात आलं आहे.

        चला तर मग पाहूया,हा कायदा नेमका काय आहे? त्यात काय तरतुदी आहेत आणि या कायद्यावर इतका आक्षेप का घेतला जातोय?

      हे विधेयक यापूर्वी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की,नक्षलवादाचा धोका फक्त दुर्गम भागात नाही,तर शहरी भागातही पसरतोय.आणि हेच थांबवण्यासाठी हा कायदा आणला जात आहे.

        पण,या विधेयकात ‘नक्षलवादी संघटना’ असा स्पष्ट उल्लेख कुठेच नाहीये.त्याऐवजी,फक्त ‘व्यक्ती’ आणि ‘संघटना’ असा उल्लेख आहे. याचा अर्थ, कोणताही माणूस किंवा कोणतीही संघटना सरकारविरोधात कोणत्याही विषयावर बोलू शकणार नाही.

        फक्त राजकीय पक्ष किंवा संघटनाच नाही,तर पत्रकार, विचारवंत,कवी,लेखक,युट्यूब चॅनल चालवणारे असे कुणीही सरकारच्या धोरणांवर टीका करू शकणार नाहीत. 

       जर कुणी सरकारला विरोध केला,तर सरकार या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करू शकतं.सरकारने या कायद्यावर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या, ज्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2025 होती.

       कोणतंही असं काम,ज्यामुळे आपल्या समाजात गडबड किंवा शांतता भंग होते,लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्याला ‘बेकायदेशीर कृत्य’ म्हणतात.

      उगाच भांडणं करणे,दंगा करणे किंवा लोकांना घाबरवणं. सरकारी कामात अडथळा आणणं,जसं की कोर्टात किंवा सरकारी ऑफिसमध्ये कामात व्यत्यय आणणं.पोलीस,सैनिक किंवा इतर सरकारी कर्मचारी त्यांचं काम करत असताना त्यांना धमकी देणे.मारामारी करणं,सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करणं.बंदुका, बॉम्ब किंवा इतर धोकादायक वस्तू वापरणं किंवा दुसऱ्यांना त्या गोष्टी वापरण्यासाठी भडकावणं.रेल्वे,रस्ते,विमान किंवा जहाजांच्या मार्गात अडथळे निर्माण करणं.ज्यामुळे लोकांची गैरसोय होईल.तसंच,लोकांना सांगणं की,‘कायदा मोडायला काही हरकत नाही’ किंवा ‘सरकारच्या नियमांचं पालन करू नका’.

      अशा या सर्व वरील बेकायदेशीर गोष्टी करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तू गोळा करणं.ही कृत्य तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करत असाल किंवा बोलून,लिहून,खुणा करून अथवा कोणताही व्हिडिओ, फोटो दाखवून करत असाल तर हे सगळं बेकायदेशीर कृत्यांमध्ये मानलं जाईल.

      जी कोणतीही संघटना वर सांगितलेली कोणतीही ‘बेकायदेशीर कृत्यं’ करत असेल, किंवा अशा कामांना प्रोत्साहन देत असेल, मदत करत असेल किंवा त्यांना पाठिंबा देत असेल, तर ती ‘बेकायदेशीर संघटना’ मानली जाईल.

     यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की,‘संघटना’ म्हणजे कोणताही गट,मग त्याचं नाव काहीही असो,तो नोंदणीकृत असो वा नसो किंवा त्या गटाचे नियम लिहिलेले असोत वा नसोत.अशा कोणत्याही संघटनेला ‘बेकायदेशीर’ ठरवण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत थेट राज्य सरकारला असेल.यामुळेच या विधेयकावर सर्वात मोठा आक्षेप घेतला जातोय.कारण सरकार कोणालाही ‘बेकायदेशीर’ ठरवू शकते अशी भीती आहे.

     या विधेयकानुसार,जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकांमध्ये भाग घेईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा देणगी स्वीकारेल अशा व्यक्तींना तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

     या कायद्यांतर्गत केलेल्या इतर गुन्ह्यांसाठी सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

      जर एखादी व्यक्ती संघटनेचा सदस्य नसतानाही संघटनेला मदत करत असेल. तर त्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

      सर्वात महत्त्वाचं म्हणजे,हे सगळ ‘दखलपात्र’ म्हणजे पोलिसांच्या वॉरंटशिवाय असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करता येणार आहे.आणि यामध्ये ‘अजामीनपात्र’ म्हणजे जामीन मिळण्याची शक्यता कमी असेल.

      सरकारला मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार 

या विधेयकामुळे प्रशासनाला खूप जास्त अधिकार मिळतील असं म्हटलं जातंय.जर सरकारला वाटलं की एखादी व्यक्ती किंवा संघटना बेकायदेशीर कृत्य करत आहे.तर कोणतीही निश्चित व्याख्या नसतानाही त्यांना अटक करण्याचा अधिकार सरकारला मिळेल.

     सरकारने एखादी संघटना बेकायदेशीर ठरवली,तर शासकीय आदेश काढून ते जाहीर करण्याचा अधिकार सरकारला राहील.

     एखादी व्यक्ती किंवा संघटना ‘बेकायदा’ ठरली, तर त्यांनी या कृत्यांसाठी ज्या जागेचा वापर केला असेल ती जमीन आणि मालमत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार सरकारला असेल.यामध्ये एखाद्या व्यक्तीचं घरही येऊ शकतं.

       जर जप्त केलेली वस्तू जनावरं असतील किंवा नाशवंत वस्तू असतील, तर त्याची विक्री करण्याचा अधिकारही पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे.

       एकूणच,हे विधेयक नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर जसे की बोलण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम करेल असं म्हटलं जातंय.

      महाराष्ट्र सरकारने आणलेले हे विधेयक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं अनेक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणत आहेत. यामुळे सरकारला अमर्याद अधिकार मिळतील आणि ते विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी याचा वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावं अशी मागणी अजूनही विविध राजकीय पक्ष आणि लोकशाहीवादी संघटना करत आहेत.

       महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा हा नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर टाच आणणारा असल्याने आणि सरकारला विशेष अवास्तव अधिकार प्राप्त करून देणारा असल्याने,”हा कायदाच संविधान द्रोही ठरतो आहे….