शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दक्षिण कोरियात भारताचे प्रतिनिधित्व करणारी कु.मेहंदी चंदनखेडे यांचे नुकतेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील निवासस्थानी आगमन झाले असून त्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल विदर्भातून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव होतोय आहे.

मेहंदी यांची पुण्याच्या फरगुशन काॅलेज मधून दक्षिण कोरिया येथे एका प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या संदर्भात निवड झाली होती.
तिथे मेहंदीने प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त करीत स्वतः सोबत देशाचे नाव रोशन केले आहे .हे येथे उल्लेखनीय आहे.
उच्च शिक्षित मेहंदी ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या सदस्य सोनाली चंदनखेडे यांची कन्या आहेत.

अनेकांनी केले मेहंदीचे अभिनंदन!
दक्षिण कोरियात यशस्वी व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मेहंदी चंदनखेडे यांचे मूल नगरीचे सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार, गडचिरोली येथील सेवानिवृत्त नायब तहसिलदार बालाजी सोपनकर, चंद्रपूरचे सेवानिवृत्त नायब तहसिलदार लिमचंद पेंढारकर, से.नि.नायब तहसिलदार रविन्द्र नेरकर,से .नि.ना.तहसिलदार दिपक खटी ,राजू यामावार ,से.नि.ना.तहसिलदार संजय राईंचवार, साधना धकाते सेवानिवृत्त खनिज निरीक्षक बंडू वरखेडे,राजूराचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, चंद्रपूरचे से .नि.मंडळ अधिकारी प्रदीप जूमडे, पत्रकार शंकर चव्हाण, रामदास हेमके,मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ, विकास गेडाम दशरथ वाकूडकर,चिमूरचे व्यवसायी नितीन लोणारे, पत्रकार रामदास हेमके, चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे भुवनेश्वर निमगडे राजूराचे आदिवासी नेते वामन आत्राम, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे, रविन्द्र उमाठे, प्रकाश रेड्डी,समाजसेविका मृणाल कांबळे, भंडाराच्या अंजली खंडाईत,मंगला कोवे ,गडचिरोलीच्या ॲड.कविता मोहोरकर,जेष्ठ लेखिका उषाकिरण आत्राम,लता निदेंकर,नागपूरच्या समाजसेविका नयना झाडे, प्रा.वैशाली राऊत ,दिशा ठाकरे भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी,व प्रियंका आत्राम, यांनी मेहंदीचे अभिनंदन केले आहे.



