कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील शहरात आणि ग्रामीण भागात सुरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन भीम शक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कन्हान पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांना दिले.
यावेळी पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी निवेदन स्वीकारून अवैध धंद्यावर अंकुश लावून कारवाई करण्याचे आश्वस्त केले.
कन्हान शहारात आणि ग्रामीण भागात मागील अनेक दिवसापासुन वाळू,कोळसा,जनावरे वाहतुक,सट्टा,जुगार,सुंगधित तंबाकु,गांजा,देह व्यवसाय,अवैध दारु विक्री,एमडी अर्मलपदार्थ सारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात पोलीसांच्या आशीर्वादाने जोमाने सुरु आहेत.
नशा करणाऱ्यांवर व अवैध धंदे करणाऱ्यांवर आणि अपराधीत वृत्तीवर पोलीसांचा धाक नसल्यामुळे,अपराधिक वृत्तीचे मनोबल वाढत आहेत.किंबहुना मनोबल फोफावत आहे.
कन्हान पोलीस स्टेशन कार्यालयात अपराधिक वृत्तीचे वावर सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे,ज्यामुळे पोलीसांचा धाक अपराधिक वृत्तीच्या लोकांमध्ये कमी होत आहे व सामान्य नागरिकात यामुळे पोलीसांची प्रतिमा मलीम होत आहे.तसेच यामागे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
यामध्ये डीबी पथकासह कर्मचाऱ्यांचे मोबाइल सीडीआर काढला तर अपराधिक व्यक्तिंना संरक्षण देण्याचे पुरावे समोर येतील.अश्या पोलीसांच्या कृत्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा धुमिल होत आहे.अश्या अपराधी वृत्तीच्या लोकांनावर आळा घालणे अत्यंत गरजेचे झाले आहेत.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असलेले संपूर्ण अवैध धंद्यावर कारवाई करून अपराधी वृत्तीच्या गुन्हेगारांवर मोका,मोकोका,एम.पि.डी.आय,तसेच विविध धारा लावून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन भीम शक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कन्हान पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार नागपूर ग्रामीण तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना सादर केली.
मोठ्या प्रमाणात रेती चोरी व सट्टा जुगार….
कन्हान शहरासह ग्रामीण भागात सत्रापुर,सिहोरा,निलज खंडाळा,नरसाळा,पिपरी गाडेघाट,जूनिकामठी,घाटरोहणा,नांदगांव,एसंबा सह ग्रामीण भागात जोमात सुरू आहे.याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक प्रमुख डीवायएसपी अनिल मस्के यांनी विशेष लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी मनोज गोंडाने,नितीन मेश्राम,रवींद्र दुपारे,राजेश फुलझेले,रॉबिन निकोसे सह रिपब्लिकन भीमशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



