Home Maharashtra खासदार शामकुमार बर्वे हे जिल्हा कृषी अधीक्षक,कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या चमूसह शेतकऱ्यांच्या...

खासदार शामकुमार बर्वे हे जिल्हा कृषी अधीक्षक,कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या चमूसह शेतकऱ्यांच्या बांधावर…  — शेतकऱ्यांशी भेटी अंतर्गत सविस्तर चर्चा..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :- रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.श्याम कुमार बर्वे हे जिल्हा कृषी अधीक्षक,कृषी अधिकारी शास्त्रज्ञ यांच्यासोबत शेतातील बाधावर पोहोचले व शेताची पाहणी केली.

          जिल्हा कृषी अधीक्षक श्री.रवींद्र मनोहरे,पारशिवनी तालुका कृषी अधिकारी श्री.राकेश वसु यांच्याशी खासदार शामकुमार बर्वे यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शेतकरी हितार्थ पारशिवनी तालुक्यातील कन्हान मंडळांतर्गत प्रत्यक्ष भेटीचे नियोजन केले होते.

         जिल्हा कृषी अधीक्षक श्री.रविंद्र मनोहरे हे शास्त्रज्ञांच्या चमूसह शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याकरिता भेट दिली.यावेळी शास्त्रज्ञ डॉ.श्री. विनोद खडसे,डॉ.श्री.राहुल वडस्कर,हे देखील प्रामुख्याने उपस्थित झाले होते.

         बांधावरील प्रत्यक्ष भेटीत शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांना जमीन सुपीकता,जमिनीचे आरोग्य पत्रक,जमिनचे महत्व,फळबाग लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान,याविषयी माहिती दिली.

        यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे यांच्या हस्ते,शेतीबद्दल आवड असणारे खासदार श्री.श्यामकुमार बर्वे यांनी देखील आरोग्य पत्रिकेचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतः मृदा आरोग्य पत्रिका काढली.

            सदर मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आली,यावेळी खासदार श्री.श्यामकुमार बर्वे यांनी शेतकरी हितार्थ जिल्ह्यामध्ये कृषी विभागास सजग राहण्याबाबत सूचना दिल्या व खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे फसगत होणार नाही याबाबत दक्षता बाळगण्याच्या सूचना देखील दिल्या.

      जिल्हा कृषी अधीक्षक यांनी कृषी विभाग शेतकरी बांधवांची कुठेही फसगत होऊ नये याबाबत सर्व अधिकारी,कर्मचारी तत्परतेने शेतकरी हितार्थ मोहीम राबवत असल्याबाबतची माहिती दिली.

      यावेळी बोरीसिंगोरी येथील सरपंच श्री.इंगोले,खंडाळा घा.येथील उपसरपंच श्री.चेतन कुंभलकर,माजी सरपंच श्री.हेमंत नागपुरे,ग्रामपंचायत सदस्य श्री. रामचंद्रजी चकोले,श्री.धनराज चकोले,कृषी मंडळ अधिकारी प्रभाकर शिरपूरकर,उपकृषी अधिकारी श्री.एस.पी.कुबडे,श्री.रोमन पाहुणे,प्रफुल नागपुरे,शेखर नागपुरे,रत्नाकर शास्त्रकार,मनोज पोहणे,राकेश पोटभरे,इत्यादी बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

         याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे व शेतकरी बांधवांचे आभार स्थानिक सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे यांनी व्यक्त केले.