Home Social मोहरम निमित्ताने चंद्रपूरातील फुलांची बाजारपेठ फुलली!..  — गुलाब व गुलाबाच्या पाकळ्यांना...

मोहरम निमित्ताने चंद्रपूरातील फुलांची बाजारपेठ फुलली!..  — गुलाब व गुलाबाच्या पाकळ्यांना ग्राहकांची वाढती मागणी!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

         मोहरम निमित्ताने तीन चार दिवसांपासून चंद्रपूर येथील फुलांची बाजारपेठ चांगलीच फुलली असल्याचे आज प्रत्यक्षात दिसून आले.शनिवारी संध्याकाळी या बाजारातील फुलांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसली.

        पांढ-या शेवंतीसह गुलाबाचे फुले व गुलाबांच्या पाकळ्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे एका फुल विक्रेत्याने आमच्या प्रतिनिधीस सांगितले.उद्या परत फुल बाजारात गर्दी राहील असा तो फुल विक्रेता म्हणाला.