Home Social नागपूरात पार पडला थाटात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वर वधू परिचय मेळावा!.....

नागपूरात पार पडला थाटात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वर वधू परिचय मेळावा!.. — स्नेह पुकारच्या संपादिका संगिता राजेश पिसे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन!..  — कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती!…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       कर्मयोगी,तेली समाजरत्न तथा ‘स्नेही पुकार ‘ मासिकाचे संस्थापक स्व.राजेेशजी पिसे यांच्या जयंती प्रित्यर्थ गुणवंतांचा सत्कार सोहळा व वर वधू परिचय कार्यक्रम नुकताच थाटात पार पडला. 

       सदर कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन हॉल, सिताबडीॅ नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

           आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाहू गार्डन कॉन्व्हेंटचे संचालक उमेश शाहू यांनी विभूषित केले होते तर याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेरार फायनान्सचे संस्थापक मारोती जौंजाळ व कमला नेहरू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.अरविंद शेंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण ‘ स्नेही पुकार ‘च्या मुख्य संपादिका श्रीमती संगीता राजेश पिसे यांनी केले.

         कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व वर वधू उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले.

           संगिता पिसे यांनी आपल्या भाषणातून स्व. राजेशजी पिसे यांच्या कार्याचा परिचय देत त्यांच्या आठवणींना या वेळी उजाळा दिला.