चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा..
नुकतेच शाळा,कॉलेज,महाविद्यालय सुरू झालेले आहेत.लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत चौकातून विद्यार्थी जात असतात.एकोडी चौक,कटकवार चौक,नागझिरा चौक,लाखांदूर चौक,या चौकातून विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात.
कित्येक विद्यार्थी सायकलने जातात,या विद्यार्थ्यांत लहान सुध्दा असतात.सदर चौकामध्ये पोलीस विभागाचे कर्मचारी अगोदर दिसायचे.
परंतु आता दहा दिवस झाले या चौकामध्ये एकही पोलीस विभागा कर्मचारी शाळेच्या वेळेवर दिसत नाही.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकामधून सुध्दा गाडी चालक हे कशाही पद्धतीने गाडी चालवण्याच्या प्रयत्न करतो.जर पोलीस विभागाचे कर्मचारी त्या चौकात उभे असल्यास त्यांच्यावर थोडा धाक असतो व सुरळीत रहदारी सुरू असतय.
परंतु कोणत्या चौकात पोलीस विभागाचे कर्मचारी शाळेच्या वेळेत 9 ते 11 व सायंकाळी 4 ते 6 अशा वेळेत पोलीस विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी असणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे या चौकात पोलीस विभागाने आपले कर्मचारी तैनात करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने डी जी रंगारी,यादोराव गणवीर,जगदीश रंगारी,शीतल नागदेवे,गणेश गजभिये व इतर कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी मागणी केलेली आहे.



