Home Political भंडारा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा संपन्न… 

भंडारा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा संपन्न… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

भंडारा : येथे पूर्व विदर्भस्तरीय संयोजक मंडळ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुकीच्या संदर्भात भंडारा येथील विश्रामगृहात सभा घेण्यात आली.

       सभेचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. सुजाता वालदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम ,विदर्भ संयोजन मंडळीचे सदस्य मुरलीधर मेश्राम ,भगवान भोंडे, विवेक हाडके,,महिला निरीक्षक टेंभुर्णे, माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.

           सभेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदच्या निवडणुकांना समोर जाताना काय काळजी घ्यायची ,प्रत्येक वार्डात उमेदवार उभे ठेवायचे, प्रत्येक वार्डात वॉर्ड समित्या, आणि नगरसेवकाचे उमेदवारी या विषयावर चर्चा करण्यात आली.

        मार्गदर्शन करताना राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम यांनी सांगितले की बाबासाहेबांच्या सवलतीच्या फायदा सर्वजण घेतात परंतु चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वेळ देत नाही ओळख कामाने होते पदांनी होत नाही.

       त्यासाठी चळवळ मोठी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले तर राष्ट्रीय समितीचे सदस्य ॲड. सुजाता वालदे यांनी सांगितले की बाळासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवण्याकरिता फार मोठे घटक आहेत आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीसाठी आपण काम करू.

        काम करणाऱ्यांची कदर नेहमीच होते कार्याची दखल वरिष्ठ घेतात चळवळी संदर्भात आंबेडकर चळवळ आपल्या रक्तात पाहिजे ,जिद्द आपल्यामध्ये असले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे याप्रसंगी विवेक हाडके, मुरलीधर मेश्राम, सुनीता टेंभुर्णे, डी जी रंगारी इत्यादी मान्यवरांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले.

        कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आयोजक व माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी केले तर आभार डॉ.सुनिल जीवनतारे यांनी मानले. कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि जे विधानसभा निवडणुकीला उभे होते ते सर्व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

        सभेला दिलिप वानखेडे, मनोजकुमार खोब्रागडे,आनंद चौरे, अचल मेश्राम,भागवत मेश्राम, कैलास गेडाम, विलास मेश्राम, सुरेश खंगार, दीपक जणबंधू, तुळशीराम गेडाम, जगदीश रंगारी ,शितल नागदेवे ,संतोष लाडगे, गणेश गजभिये ,किशोर मेश्राम, स्नेहा रामटेके, हिना रंगारी, सुकेसरी कालेकर, सविता वालेदे ,रोशन मेश्राम ,राहुल गजभिये , शीला मदामे, अमित वैद्य ,श्रीकांत नागदेवे, मुस्ताक पठाण, यादोराव गणवीर व इतर कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते.