बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी-दिंडी सोहळ्याचे बोडके परिवार व पिंपरी बुद्रुक गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थ यांनी नामाच्या जयघोषात जेंगी स्वागत करण्यात आले.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी- दिंडी सोहळ्याची गेली 25 वर्षापासून सेवा करण्याची परंपरा ही कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या वतीने चालत आलेली आहे.
आजही लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा सुभद्राबाई महादेवराव बोडके,माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके,यांनी ही सेवा अशीच पुढे चालू ठेवलेली आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके पायी दिंडी स्वागत प्रसंगी बोलत असताना म्हणाले की,माझे वडील कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांनी गावाची तालुक्याची व जनतेची प्रामाणिक पणे सेवा केली. या सेवेतून वारकऱ्यांचीही सेवा करण्याची सदबुद्धी बोडकेदादा यांना परमेश्वरांनी दिल्यामुळे,चालत असलेल्या पायी सोहळ्यासाठी कधीही खंडन पडू देणार नाही इथून पुढेही पालखी सोहळ्याच्या महाप्रसादाची अशीच सेवा करीत राहीन व आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन.
माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके यांचे पालखी सोहळ्याप्रसंगी उदगार…
बोडके परिवारातील प्रमुख शिवाजी अण्णासाहेब बोडके, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके ,दत्तू नाना बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके,प्रगतशील बागायतदार केशव बोडके पोपट बोडके सर्व बोडके परिवार आणि पिंपरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे फटाक्याच्या आवाजात व पुष्पवृष्टी करून हरिनामाच्या जयघोशात टाळ व मृदंगाच्या आवाजात स्वागत करण्यात आले.
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळा आल्यानंतर हरी नामाच्या गजरात टाळ आणि मृदंगाच्या आवाजात भजन करण्यात आले तसेच ह भ प श्री नवनाथ भाऊ दहिवाळ यांनी एक तास प्रवचन सेवा करून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची महाआरती घेण्यात आली.
ग्रामस्थांनी रांगा करून पालखीचे दर्शन घेतले पायी दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व वारकरी संप्रदायिक भाविक भक्त व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील आलेल्या ग्रामस्थांन सह सर्वांना दुपारी महाप्रसादाचे वाटपही मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
क्षेत्र शेत्र श्री ज्ञानेश्वर मंदिर नेवासा जिल्हा अहमदनगर येथून प्रस्थान होऊन इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येते दुपारचा महाप्रसादासाठी सालाबाद प्रमाणे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके परिवाराच्या निवासस्थानी हजेरी लावली.
दिंडी प्रस्तावना पासून अनेक ठिकठिकाणी वारकऱ्यांना अल्पोपाहार, चहा, दूध फळे पिण्यासाठी शुद्ध पाणीही मोठ्या प्रमानात देण्यात येते.
दुपारच्या महाप्रसादा नंतर पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी अकलूज येथे दाखल झाली.



