Home Vidarbha जलनगर वार्ड मधील नाल्यांची सफाई व रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर… —...

जलनगर वार्ड मधील नाल्यांची सफाई व रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर… — चंद्रपूर मनपाला आपचे निवेदन सादर… — नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता?.. 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       आम आदमी पार्टीच्या वतीने जल नगर वॉर्डातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेता महानगरपालिकेला काल एक लेखी निवेदन देण्यात आले.

        जल नगर वॉर्डातील नाल्यांची व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या भागातील नागरिक अनेक दिवसांपासून डास, दुर्गंधी व दूषित पाण्यामुळे त्रस्त आहेत. सार्वजनिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप लक्ष पुरविले नसल्याचा आरोप आपने केला आहे.

          या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने जल नगर वॉर्डातील नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेला निवेदन देत तात्काळ नाल्यांची सफाई व रस्त्यांचे दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी तबुसम शेख यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.