Home देशविदेश माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन!,”पण, शेतकऱ्यांच्या अपमानाचे...

माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन!,”पण, शेतकऱ्यांच्या अपमानाचे गुढ काय?… — शेतकऱ्यांचा अपमान करण्यात सत्ता पक्षांच्या मंत्री-आमदारांना स्वारस्य कशाचे?

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान भाजपाचे आमदार व सत्तापक्षाचे मंत्री करीत आहेत.

             महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या करण्यात आलेल्या अपमानाबाबत माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुद्दा उपस्थित करून भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी विधानसभेत लावून धरली.

           या मागणीदरम्यान मोदी असेल तुमचा बाप,आम्हाला काही करायचे नाही.शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या भाजपा आमदारांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे असे बोलून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षाच्या आसनाकडे गेले.

            या घडामोडी नंतर विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आजच्या कामकाज काळाच्या वेळेपुरते आमदार नाना पटोले यांना विधानसभेतून निलंबित केले…

         विधानसभेतून आमदार नाना पटोले यांना निलंबित करण्यात आलेले कारण भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना योग्य वाटले असेल….

          पण,या-ना-त्या कारणाने महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री व आमदार अकारण शेतकऱ्यांचा अपमान करतात याचे नेमके गुढ काय आहे,हे सत्तपक्षातील कोण बाहेर पाडणार?असा प्रश्न निर्माण होतो आहे.तद्वतच शेतकऱ्यांचा करण्यात येणाऱ्या अपमानात सत्ताधारी सहभागी आहेत काय? हा प्रश्न सुध्दा अधिक गंभीरता निर्माण करतो आहे.

           महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिकरित्या करण्यात येत असलेल्या अपमानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपापल्या मंत्र्यांना व आमदारांना शहानपणाची गंभीर समज का म्हणून देत नाही? हा मुद्दा सुध्दा महत्वाचाच!..

          विधानसभा निवडणुकीत बहुमतात निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचारादरम्यान बोलले होते याची कल्पना त्यांना जाणिवपूर्वक आहे…

            असे असताना,महाराष्ट्र राज्याची सत्ता प्राप्त होताच योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु म्हणणे न्यायसंगत आणि शहाणपणाचे आहे काय?यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ता पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी व आमदारांनी विचार करण्याची गरज दिसते आहे…

           शेतकरी केवळ शेतकरी नाहीत तर ते मतदार आहेत आणि या देशातील महत्त्वपूर्ण घटक आहेत,हे भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षांचे जबाबदार लोकप्रतिनिधी का म्हणून विसरतात हेच कळायला मार्ग नाही…

         तद्वतच शेतकऱ्यांचा अपमान करण्यात सत्ता पक्षांच्या मंत्री-आमदारांना स्वारस्य का म्हणून आहे? यांच्या खोलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले असतीलच!,मग? शेतकऱ्यांचा वारंवार करण्यात येणारा अपमान त्यांना मान्य नसेल तर त्यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना वेळीच आवरायला नको काय?..

           परंतु शेतकऱ्यांचा अपमान करुन मंत्री व आमदारांना काही मिळत नसेल तर ते का म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत अयोग्य व चुकीचे वक्तव्य करतात? हा मुद्दा अतिशय गंभीर आहे..