Home Maharashtra अंगणवाडी सेविका भरतीत टोल्यांवरील महिलांना प्राधान्य द्या – आमदार रामदास मसराम यांची...

अंगणवाडी सेविका भरतीत टोल्यांवरील महिलांना प्राधान्य द्या – आमदार रामदास मसराम यांची मागणी.. — मानधन वाढीसाठी पाठपुरावा…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी…

     गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदभरती करताना महसुली गावांऐवजी टोल्यांवर वास्तव्यास असलेल्या स्थानिक महिलांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्री कु. अदिती तटकरे यांच्याकडे केली.

       या मागणीसंदर्भात आमदार मसराम यांनी दि. २८ मे रोजी अधिकृत निवेदन दिले असून दि. ३० जून रोजी त्याबाबत पुनः पाठपुरावा केला आहे.टोल्यांवर कार्यरत अंगणवाडी केंद्रांसाठी स्थानिक महिलांची निवड झाल्यास सेवा नियमित व परिणामकारक राहील,असे त्यांनी स्पष्ट केले.

         यासोबतच,अंगणवाडी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या स्वयंपाक सेविकांना सध्या केवळ ₹1000 मानधन दिले जाते,जे अत्यंत अपुरे आहे.त्यामुळे त्यांचे मानधन किमान ₹5000 करण्यात यावे,अशीही मागणी आमदार मसराम यांनी मंत्री तटकरे यांच्याकडे केली आहे.