ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : येथील रहिवासी कु. लिसा प्रशांत राऊत रा.पंचशील वॉर्ड अजितबाबा समाधी चौक साकोली येथील ह्या मुलीला जन्मापासुन दोन्ही कानाला आवाज येत नव्हते.उपचाराचा व ध्वनी श्रवण यंत्राचा खर्च मोठा होता.त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब असलेल्या प्रशांत राऊत यांना परवडणारा नव्हता.
सौ मेघा कृष्णा बडवाईक यांना ही गोष्ट मुलीची आई सौ हिना राऊत यांनी सविस्तर सांगुन आपल्याला कोणी मदत करेल का असा आशय व्यक्त केला.यावर क्षणाचा विलंब न करता सौ मेघा बडवाईक यांनी जिल्हा परिषद सदस्या वनिताताई डोये,मंगेश ठेंगरी, व संदीप भांडारकर यांच्या माध्यमाने माजी राज्यमंत्री व विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या लाखनी येथील ०१ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या जनता दरबारात समस्या मांडली व परिणय फुके यांनी मदतीचे आश्वासन दिले.
दिनांक २८/०६/२०२५ रोजी झालेल्या जनता दरबारात कु. लिसा राऊत हिला दोन्ही कानाकरीता ध्वनी श्रवण यंत्र आ. परिणय फुके यांनी आपल्या मदतनिधीतून उपलब्ध करुन दिले.याबद्दल परिणय फुके यांचे परिसरात अभिनंदन केले जात आहे.



