Home Maharashtra गोंडवाना वि‌द्यापीठाच्या वतीने ‘युग प्रवर्तक डॉ.हेडगेवार’ या नाटकाचा प्रयोगाचा तीव्र विरोध व...

गोंडवाना वि‌द्यापीठाच्या वतीने ‘युग प्रवर्तक डॉ.हेडगेवार’ या नाटकाचा प्रयोगाचा तीव्र विरोध व निदर्शने…

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने दि. ३० जून २०२५ रोजी ‘युग प्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या नाटकाचा प्रयोग विद्यापीठाच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

        वास्तविक गोंडवाना वि‌द्यापीठ ही संस्था शासनाचा निधी व विद्यार्थ्यांच्या शुल्कातुन चालवण्यात येते. त्यामुळे या विद्यापीठात एका विशीष्ठ विचारधारेचा प्रचार – प्रसार करणे अतिशय चुकीचे व बेकायदेशीर आहे. गोंडवाना विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरु करण्यात आलेले आहे. कोणत्या एका विचारसरणीच्या प्रचार प्रसारासाठी नाही. 

         डॉ. हेडगेवार यांचा वि‌द्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाशी अथवा देशातील दलीत आदिवासी, -अन्य संख्यांक समुदायाच्या कल्यानाशी कोणताही सबंध नाही.

       असे असतांना डॉ. हेडगेवारांच्या जीवनावरील नाटक विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करणे पुर्णतः अनुचित तर आहेच परंतु बहुसंख्येने असलेला दलीत – आदिवासी विद्यार्थ्यांवर त्यांचा विचार सोपविन्याचा आहे. याचा आम्ही तिव्र निषेध करत आहोत.

       करिता गोंडवाना विद्यापीठात दि. ३० जून २०२५ रोजी होउ घातलेला ‘युग प्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात यावा. अन्यथा आम्ही विविध सामाजिक – राजकीय संघटनांच्या वतीने दि. ३० जून २०२५ रोजी विद्यापीठाच्या समोर तिव्र आंदोलन करु व त्यामुळे होणाऱ्या परिणामास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असे निदर्शन करणाऱ्यांनी कळविले आहे. विविध संघटना व राजकीय पक्ष यावेळी उपस्थित होते