देव आहे की नाही , हेच सिद्ध झाले नाही,म्हणून देव देव करणारे विचारवंत म्हणतात की,देव हे विद्न्यान प्रयोग शाळेत प्रयोगाद्वारे सिद्ध करून सांगायची गोष्ट नव्हे तर देव ही मानायची गोष्ट आहे,किंवा देव हा केवळ मानायचा असतो,अनुभवायचा पण नसतो,कारण अनुभवणे म्हणजे अतीसूक्ष्म वस्तू दुर्बिणीतून पाहणे, पंच इंद्रियांना जाणीव होणे म्हणजे अनुभवणे होय,असा अनुभव अल्ला गॉड ईश्वर चा नसतो,म्हणून तो अनुभवता येत नाही,साक्षात्कार पण होत नाही,तर देव म्हणजे कल्पना,संकल्पना,स्वप्न , भास म्हणजे मृगजळ किंवा क्षितज सारखे आहे, मनी वसी ते स्वप्नी दिसे,स्वप्नी दिसे ते भासमान अशी मांडणी विचारवंत करतात,मात्र ते संकल्पनावर श्रद्धा ठेवूनही आपले कार्यसिद्धी करता येते,एक सुखद अनुभव घेता येतो,जे संतानी घेतला,एखाद्या संकल्पनेचा ध्यास लागला की,त्यातून काही कार्य घडते, तसे देवाचे आहे,
देव मानण्याचे काही प्रकार आहेत,काही भक्त ईश्वर निर्गुण निराकार आहे,म्हणून मूर्तिपूजा अमान्य करतात,कर्मकांडाला महत्त्व देत नाहीत,म्हणजेच पूजापाठ,तीर्थ यात्रा,अनुष्ठान महापूजा,देवळाचा धर्म पाळत नाहीत,तर फक्त देवाचे नाव घ्यायचे,तो ध्यानी मनी ठेवायचा,फक्त मुखाने नाम स्मरण करायचे,त्यास काही द्यायचे नाही,की काही मागायचे नाही,निस्वार्थ भावनेने त्यास मानायचे,कोणतेही कर्मकांड करायचे नाही,अशी निष्काम भक्ती वारकरी संप्रदायात आहे,अशी भक्ती वारकरी संतानी केली,फक्त त्यांनी हाती काम मुखी नाम , अशी त्यांची भक्ती,आणि कीर्तनाद्वारे पांडुरंग महिमा सांगितला,ते म्हणाले ” शेंदूर लाऊन धोंडा,त्याशी पूजतात, पोरे रांडा. जरी का नवसे पुत्र होती,का करणे लागे पती. जत्रेमे फ त रा बीठाके,तीर्थ बनाया पाणी, और कर दिया पैसेकी धूळधाणी ” अशी संतांची बरीच वचने आहेत,पण धर्मभोळे अद्न्यानी यांना आपले हित कशात आहे,हे समजत नाही,गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांनी खरा देव आत्म्यात आहे,माणसात आहे,पशु पक्षी वृक्षात आहे, आई बाप आहे,गोरगरीब जनतेची सेवा करण्यातच खरा देव आहे, आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी ,कशाला जाऊ मी पंढरपुरी,कशाला पंढरी जातारे बाबा,कशाला पंढरी जाता ,हे गीत गाऊन त्यांनी आपले आयुष्य झिजवले ,पण अंधभक्तानी ते मानले नाही,जन सेवा हीच ईश्वर सेवा असे द्न्यनेश्वर माऊलीने सांगितले,तर ऐकले नाही,ऐकत नाहीत,याचे कारण अंधश्रद्धा,ही कुणी निर्माण केली,देवधर्माची गुलामी कुणी निर्माण केली ? तर येथील विषमतावादी दुष्ट भ्रष्ट कावेबाज लोकांनी.यांनी मानसिक दृष्ट्या बहुजन श्रमिक लोकांना देवाधर्माचे गुलाम बनविले,कारण बहुजनांनी फक्त देवाधर्माच्या नादी लागून फक्त कर्मकांड करीत बसावे,आणि कष्ट करून मिळविलेला पैसा या दुर्जन दुष्ट ऐतखाऊ बोक्या ना या कर्मकांडद्वारे द्यावा.हे यांचे षड्यंत्र आहे,हे भाविक भक्तांच्या डोक्यात घुसले नाही,म्हणून कामधंदा सोडून ,कष्टाने कमावलेले पैसे जत्रा यात्रा मध्ये वाया घालवितात,देवाच्या नावाने.म्हणून शाहीर दिगू तुमवाड नी या भाविक भक्ताना जागृत करण्यासाठी ” भोळ्या खुळ्या लोकांना देऊन भूल थाप,देवाच्या नावावर करतात पाप ” हे गीत तयार करून गात राहिले.या गीतात लबाड लांडगे बहुजनास कसे आणि कुठे कुठे फसवतात,त्यांचे आर्थिक शोषण कसे करतात ? याचे विश्लेषण केले आहे.
आधी देव निर्मिला आणि त्याच्या पर्यंत पोहचण्याची वाट म्हणून धर्माची निर्मिती केली,याचे तीन कारणे आहेत,1आपण देवाधर्माच्या नावाने लोकांचे आर्थिक शोषण फायदा नफा कमवायचा 2 आपण शोषण करतो हे शोधिताना समजू नये,म्हणून देव धर्म पुढे करायचा,म्हणजेच तुम्ही तुमचे पैसे धन द्रव्य आम्हाला देत नाही,तर देवाला देऊन,तुम्ही तुमचे नवस फेडता,पुण्य पदरी पाडून घेता,हे त्यांच्या डोक्यात घुसायचे,कथा पोथी,कीर्तनातून.3 आपली सत्ता आणि धन याचे विरूद्ध लोकांनी म्हणजे शोषितानी बंड करू नये,यासाठी लोकांना देवाधर्माचे मानसिक गुलाम करून आपली चोरी ,शोषण लपविण्याचा हा प्रकार म्हणजे कर्मकांड होय,हे शिकलेल्या लोकांच्या सुद्धा लक्षात येत नाही.
जागतिक कीर्तीचा तत्ववेत्ता विचारवंत तर म्हणाला की ” धर्म ही अफूची गोळी आहे,ती जो गिळतो, तो कायम नसेत राहतो,आपण कसे गुलाम आहोत? आपली कशी आर्थिक पिळवणूक होते आहे,हे धर्माची नशा चढलेल्यानंना कळत नाही.
हे शोषक धूर्त कोल्हे ” धर्म म्हणजे नीती,नीतिमत्ता ” हे एक लोकांच्या डोक्यात घुसविले आहे.खरे तर धर्माचा आणि नीतिमतेचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.कर्मकांड केल्याने किंवा देव धर्म मानण्यामुळे माणसात नीतिमत्ता येत नाही,तसे असते तर हे श्रीमंत लोक,नेते मंडळी भ्रष्टकार्य शोषण चोरी केलेच नसते,ही मोठे झालेच नसते,यांना सत्ता संपती प्रतिष्ठा मिळालीच नसती,उलट अनैतिकता लपविण्यासाठी हे लोक देवाचा धर्माचा उपयोग करून घेतात.बिचारे अडाणी गरीब अद्न्यानी लोक मात्र त्यांचे नादी लागतात.पुजारी महाराज राजकारणी एकच असतात,दोघे मिळून देवाची तिजोरीचा फायदा घेतात.देवस्थानचा कोटी कोटी पैसा सोने बँकेत ठेवतात,बँका श्रीमंतनाच कारखानदाराच कर्ज देतात ते ते बुडवितात,सरकारी तिजोरीतून बँका वसुली करतात,म्हणजेच देवाचा असो की सरकारचा पैसा तो शेवटी जनतेचाच बहुजनांचाच असतो,तो हे भटजी शेटजी म्हणजे लाटताना दिसतात.
अशा प्रकारे देव धर्म आणि कर्मकांड हे कष्टकऱ्यांना मानसिक गुलाम बनवून त्यांचे हे ऐतखाऊ बोके आर्थिक शोषण करतात.



