कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी:- तालुक्यातील तामसवाडी येथील सिमेंट रस्त्याच्या कामादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास मिक्सर ट्रकने झोपेत असलेल्या १९ वर्षीय मजुराला चिरडले.यात मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक गंभीर घटना घडली.
अनुज लक्ष्मीचंद यादव (रा. मांडवा,तह.जुन्नारदेव,जि. छिंदवाडा, (म.प्र.) असे मृत तरुणाचे नाव आहे.हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत तामसवाडीत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे.त्यासाठी मध्यरात्री टी.एम.मिक्सर ट्रक (एमएच १२/यूएम ६३३५) सिमेंट मिश्रण घेऊन बांधकामस्थळी पोहोचला.
ट्रक मागे घेत असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अनुज यादव याच्या अंगावरून दोन्ही चाके गेल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनुज यादव शुक्रवारीच आपल्या मित्रांसह मजुरी कामासाठी तामसवाडित आला होता.रात्री काम सुरु असताना चकून रस्त्यालगत झोपता होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवीले.
याप्रकरणी ट्रकचालक अजय प्रसाद कमल शाहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहेत.
हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीने कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दक्षता न घेतल्याचे उघड झाले आहे.ट्रक मागे घेताना वाहक किंवा मार्गदर्शक नसल्याने हा भीषण अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.



