Home Maharashtra बोरडा टोलनाका जवळ गोवंश जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त. —...

बोरडा टोलनाका जवळ गोवंश जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त. — तीन आरोपी अटक,वाहना सह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी.. 

कन्हान : – पोलीसांच्या डीबी पथकाने बोरडा टोल नाका जवळ नाकाबंदी करुन अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या पिकअप वाहनाला पकडले. 

        कारवाई अंतर्गत पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन ५,व लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

          प्राप्त माहिती नुसार सोमवार रोजी रात्री १० वाजता दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान यांना गुप्त माहिती मिळाली कि रामटेक वरुन एका पिकअप वाहना मध्ये अवैधरित्या कोणताही चारा पाणी न देता अतिशय निर्दयतेने गोवंश जाती च्या प्राण्याची कत्तलीकरीता वाहतुक होत आहे.

         अशा माहितीवरुन पोलीसांनी बोरडा टोल नाकाजवळ नाका बंदी करुन उभे असतांना महिंद्रा बोलेरो पिकअप चार चाकी वाहन क्र.एम.एच.३७,टी.२१२५ हि नागपुर- जबलपुर महामार्गाने मनसर कडुन येतांना दिसली असता पोलीसांनी वाहन चालकास थांबविण्याचा इशारा करताच चालकाने वाहन रोडच्या कडेला थांबविले.

       वाहनाची पाहणी केली असता वाहनात काही गोवंश जातीचे जनावरे ज्याची चारापाण्याची कोणतिही व्यवस्था न करता मिळुन आले.

       आरोपी शिवाजी सकाराम कुकडे (३६),अमजद खान मंजुर खान पठाण (३६), प्रदिप छगन इंगळे (२६),तीनही रा.आरेगाव ता.मेहकर,जि.बुलढाणा यांना पोलीसांनी जनावरे वाहतुक परवाना विचारले तर त्यांनी कोणत्याही परवाना नसल्याचे सांगितले.

        सदर जनावरे हे कत्तली करीता वाहतुक करीत असल्याची खात्री झाल्याने,पोलीसांनी तीन आरोपींना अटक करुन त्याचा जवळुन चार गोवंश जनावरे किंमत ८०,००० रु आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन किंमत ५,००,००० रुपये असा एकुण ५,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

        जप्त जनावरांची देखरेख व चारा पाणी करीता पोलीस स्टेशनला कोणतिही व्यवस्था नसल्याने गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे रवाना करण्यात आले. 

       सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हान,उपनिरीक्षक देशपांडे,हरिष सोनभद्रे,अमोल नागरे,जिवन विधे,मोहित झाडे सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.