Home देशविदेश लढाई आणि तिचे प्रकार…

लढाई आणि तिचे प्रकार…

  लढाया ज्या होतात किंवा होत असतात,त्यांचे वर्गीकरण केले तर पुढील काही प्रकार निदर्शनास येतात.

मुख्य दोन प्रकार

1.देशाबाहेरील लढाया 

2.देशांतर्गत लढाया 

            देशाबाहेरील लढाया या दोन देशात होतात,त्याचे कारण 1.सीमारेषासाठी.2.व्यापारी संबंध बिघडले तर.3.दोन देशातील झालेला करार नाही पाळला तर उदा.युक्रेन रशिया युद्ध.

           देशांतर्गत होणाऱ्या लढाया म्हणजे 1.धार्मिक लढाई,म्हणजे दोन धर्मीय नागरिकांची लढाई.

2.सामाजिक लढाई , म्हणजे दोन जाती मध्ये होणारी लढाई.आणि प्रवर्गासाठीची लढाई,उदा.ओबीसी विरुद्ध मराठा.आणि सवर्ण दलीत यातील लढाई.पाश्चिमात्य देशात गोरे विरुद्ध काळे ( रंगाने ) अशी लढाई.भारतातील लढाई ही वर्णाची लढाई,सवर्ण आणि अवर्ण यांची लढाई.तसेच संवर्गातील लढाई म्हणजे जनरल विरुद्ध इतर संवर्ग म्हणजे obc,sc,st,maynarity.तसेच देशी आणि परदेशी यांची लढाई म्हणजेच ब्राम्हण क्षत्रिय वैश्य या परदेशी जाती विरुद्ध obc,sc,st,mayanarity ची लढाई .

3.धार्मिक लढाई म्हणजे देशातील नागरिकांमध्ये धर्मासाठीची लढाई ,म्हणजेच आपल्याच धर्माचे राज्य असावे,आणि इतर धर्मियांनी दुय्यम नागरिक म्हणून किंवा मांडलिक किंवा गुलाम म्हणून राहावे,या उद्देशाने होणाऱ्या धार्मिक लढाया , देशांतर्गत नागरिकात असो की दोन देशातील धार्मिक लढाई असो.उदा.भारत पाकिस्तानची लढाई ही सीमारेषासाठी नसून धर्मासाठीची लढाई आहे.

 4. राजकीय लढाई , देशांतर्गत राजकीय पक्ष निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून सत्ता हस्तगत करण्यासाठीची लढाई म्हणजे राजकीय लढाई होय.वर वर पाहता असे म्हणता येईल,पण त्या त्या पक्षांचा हेतू आणि अजेंडा ( कार्यक्रम ) पाहता ,काही पक्षाची लढाई ही छुपी धार्मिक किंवा जातीची किंवा प्रवर्गाची असते.निवडणुकीत उभे केलेल्या उमेदवारांची संख्या आणि त्यांचा धर्म आणि प्रवर्ग आणि जात यावरून हे ठरविता येते की,नेमके यांना कोणती लढाई लढायची आहे ? अर्थात ही खोट्या लोकशाहीची खोटी लढाई असेच हा प्रकार करावा लागेल.

      परंतु संविधानाच्या ध्येयानुसार आणि मार्गदर्शनानुसार खरी लोकशाही देशात प्रस्थापित करायची असल्यास आरक्षण कायद्याच्या दडपणामुळे आरक्षित उमेदवार तर उभे करावेच लागतात. तरी पण उभे केलेले एकूण उमेदवारांपैकी किंवा निवडून आलेल्या एकूण उमेदवारांत कोणत्या जातीचे किती ? कोणत्या प्रवर्गाचे किती ? कोणत्या धर्माचे किती ? हा आकडा पाहून ही लढाई जातीची , प्रवर्गाची, मूलनिवासी आणि परदेशींची की धर्माची ? हे समजून येते.उमेदवारांच्या या संख्येवरून देशात खरी लोकशाही की खोटी हे ठरविता येते.

     खरे तर आपल्या देशाने सर्वधर्म समभाव,धर्मनिरपेक्षता,समाजवाद,लोकशाहीचे संविधान स्वीकारले आहे.अशा या संविधानासाठी स्वातंत्र्याची लढाई लढून अनेकांचा त्याग,बलिदान झाले द्यावे लागले.याची जाणीव ठेऊन अहिंसेच्या लोकशाही मार्गाने संविधानिक निवडणूक झाली पाहिजे,पण असे होताना दिसत नाही.कारण भारतीय नागरिकांना लोकशाहीचे महत्त्व अजून कळले नाही.कारण यांच्या रक्तात हजारो वर्षाच्या हुकुमशाही त म्हणजे गुलामीत यांचे पूर्वज होते,त्याच गुलामीचे रक्त आपल्या देशातील नागरिकात आहे.हे गुलामीचे रक्त तेंव्हाच नष्ट होईल,जेंव्हा जात धर्म प्रवर्ग वर्ग यांचे घातकीय गुणधर्म लक्षात येतील.

5.आर्थिक लढाई : म्हणजे देशात जर दारिद्र्य रेषेखालचा वर्ग,गरीबवर्ग,कनिष्ठ मध्यमवर्ग,वरिष्ठ मध्यमवर्ग,कनिष्ट श्रीमंत आणि वरिष्ठ श्रीमंत,छोटे भांडवलदार किंवा उद्योगपती आणि मोठे कारखानदार व उद्योगपती,तसेच अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,मध्यम व वरिष्ठ भूधारक म्हणजे जमीनदार ,शेतकरी इत्यादी जे आर्थिक निकष लाऊन पाडलेले वर्ग आहेत,यांच्यातील लढाई,म्हणजेच जमीनदार विरुद्ध शेतमजूर,कारखानदारा विरुद्ध कामगार,उद्योगपतींच्या विरुद्ध कर्मचारी ,तसेच सरकार विरुद्ध कर्मचारी ,सरकार विरुद्ध जनतेची लढाई .या आर्थिक मागण्या घेऊन केलेल्या किंवा होत असलेल्या लढाया म्हणजेच आर्थिक लढाई होय.

 6. जनआंदोलन आणि उठाव: हा एक सरकार विरुद्ध जनतेचे बंड असते.हे धुपुन धुऊन एकदम पेट घेते,आणि आगडोंब उसळतो,अशी ही लढाई आहे,पण ही राजकीय लढाई म्हणता येत नाही.कारण यातून कोणत्यातरी पक्षाची सत्ता स्थापन होत नाही.अशावेळी देशाचे राष्ट्रपती यांनी दिलेल्या आदेशानुसार सैन्याची कारवाही होते. सैन्या विरुद्ध जनता असे या आंदोलनास किंवा उठाव ला किंवा जनतेच्या बंडाला वळण येते.सैन्य हे शस्त्राने सज्ज असते,आणि जनता निशस्त्र असल्यामुळे जनता हरते,सैन्यदल जिंकते.राष्ट्रपती लगेच सार्वत्रिक निवडणूक घेऊन वातावरण शांत करतात.

       अशा प्रकारे राजकीय , सामाजिक,आर्थिक,धार्मिक,देशी परदेशी,आणि सांस्कृतिक लढाया असे लढाईचे प्रकार आहेत.यापैकी कोणती लढाई हिताची आणि कोणती लढाई नुकसानीची हे वाचकाने ठरवायचे आहे.

     यात लढाईचा अजून एक प्रकार जो सांस्कृतिक आहे,याचे विश्लेषण दिले नाही,कारण ही लढाई ही आमने सामन्याची नाही,तर छुपी लढाई सतत चालणारी आहे. तेव्हढी हानिकारक नाही.उदा.पोशाख,खानपान, रहन सहन,भाषा,प्रांत,वैचारिक मतभेद,कौटोंबिक वाद इत्यादी चुटुपुटूची सातत्याची लढाई आहे,ही सांस्कृतिक लढाई होतच राहते,त्यातून काही कालमानानुसार घडतच असतात.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक: 25 जून 2025.फोन: 9420912209.