Home Social सी आर पी एफ कॅम्प धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…

सी आर पी एफ कॅम्प धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

  दिनांक २१/०६/२०२५ रोजी ११३ बाटालियन सीआरपीएफ मुख्यालय कॅम्प परिसर धानोरा, गडचिरोली (महाराष्ट्र) येथे, जसवीर सिंग (कमांडंट – ११३ बाटालियन) यांच्या उपस्थितीत ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कमांडंट महोदयांनी उपस्थित उच्च अधिकारी , जवान, जवानांच्या परिवारांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या नंतर सर्वांना नियमित योगाभ्यासाबाबत जागरूक केले.

      आजच्या धावपळीच्या जीवनात असे अनेक क्षण येतात जे आपल्या जीवनशैलीला ब्रेक लावतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या तणावात, भयानक आणि विचलितपणा निर्माण करतात, ज्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. योगा हा जीवन निरोगी आणि उत्साही ठेवण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. हा शरीर आणि मन दोघांनाही बळकट करून आपले आरोग्य उत्तम राखतो. योगामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढून मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. जर दररोज नियमितपणे योगा केला तर तो उपचार आणि औषधांच्याही अधिक फायदेशीर ठरू शकतो.

     आपल्या देशातील ऋषीमुनींच्या योग परंपरेचा जग अनुकरणाने स्वीकार करत आहे. परिणामी, आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव अतिशय कमी वेळात १७७ देशांनी मंजूर केला आणि २१ जून २०१५ रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

     या प्रसंगी, जसवीर सिंग (कमांडंट), रामकिशन (उप कमांडंट), गुलाब सिंग (उप कमांडंट), बाबू सिंग (सहायक कमांडंट), अधिकारी वर्ग, सैनिक आणि सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते.