Home Social जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

भाविकदास करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

     आज दिनांक २१/६ /२०२५ रोजी जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या योग शिबिराला उपस्थित कर्मचाऱ्यांना भास्कर कायते व प्राध्यापक डॉक्टर संजय मुरकुटे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनात उपस्थित सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांना योगाचे धडे दिलेत यामध्ये ताडासन,वृक्षासन,

पादहस्तासन, त्रिकोणासन,

वीरभद्रासन,भुजंगासन,

शशांकासन,वज्रासन,

 पद्मासन,सर्वांगासन, शवासन,

पश्चिमोत्तानासन सोबत प्राणायाम 

  योगाभ्यासाबाबत जागरूक केले.

        आजच्या धावपळीच्या जीवनात असे अनेक क्षण येतात जे आपल्या जीवनशैलीला ब्रेक लावतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या तणावात, भयानक आणि विचलितपणा निर्माण करतात, ज्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. योगा हा जीवन निरोगी आणि उत्साही ठेवण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. हा शरीर आणि मन दोघांनाही बळकट करून आपले आरोग्य उत्तम राखतो. योगामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढून मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. जर दररोज नियमितपणे योगा केला तर तो उपचार आणि औषधांच्याही अधिक फायदेशीर ठरू शकतो.

      आपल्या देशातील ऋषीमुनींच्या योग परंपरेचा जग अनुकरणाने स्वीकार करत आहे. परिणामी, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव अतिशय कमी वेळात १७७ देशांनी मंजूर केला आणि २१ जून २०१५ रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे.