Home Social डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी धानोरा तर्फे भारतमातेचे सच्चे सुपुत्र, राष्ट्रवादी विचारवंत व बलिदानी नेता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या बलिदानाचा स्मरण ठेवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला.

       या प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या कार्याला अभिवादन करत देशहितासाठी त्यांच्या विचारांचे स्मरण केले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला हरित श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात भाजपा धानोरा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.