युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अमरावती येथे क्रांतीपर्व बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि 22 जून रोजी करण्यात आले होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदाजी इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात एकूण 40 जोडपी विवाहबद्ध झाली.
सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष डी.जे.खडसे गुरुजी यांच्या हस्ते व समाज कल्याण विभागाचे अधिकारी मेश्राम, संस्थेचे अध्यक्ष राजू डफाडे ,सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ डफाडे प्रमोद मेश्राम, जानराव वाटाणे साहेबराव वानखडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सोहळ्याप्रसंगी सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे समारंभाचे अध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यानंतर पूज्य भंते सारीपुत्र यांनी बुद्ध वंदना व जया मंगल अष्टगाथा विधी घेऊन नवदांपत्यास आशीर्वाद दिला. यावेळी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना चरणदास इंगोले यांनी या आदर्शदायी सर्व धर्मीय सोहळ्यांचे कौतुक करत आयोजक राजू डफाडे ओंकार खेडा नांदगाव खंडेश्वर यांचे अभिनंदन केले आणि नव वधू- वरांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.



