Home Social स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये ओबीसींना नियमानुसार आरक्षण देण्याबाबत निवेदनाद्वारे चिमूर तालुका काँग्रेसची...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये ओबीसींना नियमानुसार आरक्षण देण्याबाबत निवेदनाद्वारे चिमूर तालुका काँग्रेसची मागणी… — माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर यांच्या नेतृत्वात दिले निवेदन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

      मागील दोन महीण्यापुर्वी झालेल्या ग्रा.पं.सरपंच पदाच्या आरक्षण सोडत मध्ये चिमूर तालुका तालुक्यातील आरक्षामध्ये ओ.बी.सी.ला वगळले होते.हा ओबीसी समाज घटकांवर अन्याय आहे.या संदर्भामध्ये आक्षेप सुध्दा घेण्यात आला होता.

         चिमूर विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यात ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना तिव्र असल्यामूळे व सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामूळे ओबीसींवर कोणत्याही तालुक्यात अन्याय होता कामा नये.त्यामूळे ग्रा.पं.आरक्षण सोडत ओबीसीसाठी नव्याने काढण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे रेटून धरण्यात आली.

               एससी,एसटी प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवून ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे अशी सुद्धा मागणी झाली.

           सार्वत्रीक ग्रा.पं. निवडणूका,जि.प.,पं.स.,नगरपरषद,नगरपंचायत,महानगरपालीका यामध्ये ओबीसींना वगळून आरक्षण निश्चित करु नये,स्थानिक निवडणूकांची वार्ड निहाय रचना करीत असतांना स्थानिक लोक प्रतिनिधी व सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेवूनच नविन संरचना करावी तसेच नविन मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणी करतांना स्थानिक बी.एल.ए.यांना विश्वासात घेवूनच मतदार नोंदनी करावी यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर व तहसीलदार चिमूर यांना आज महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी तथा माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवादल महासचिव प्रा.राम राऊत सर,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,किसान सेल तालुका अध्यक्ष राजूभाऊ कापसे,तालुका सचिव विजय डाबरे,उपाध्यक्ष विवेक कापसे,जेष्ठ नेते केशवजी वरखडे,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव सचिन गाडीवार,सरपंच लोकांनाथ रामटेके,प्रशांत कोल्हे,युवक अध्यक्ष नागेद्र चट्टे,प्रशांत डवले,लटारु सूर्यवंशी,रामदास चौधरी,मधुकर मुंगले,घानश्याम रामटेके,विजयजी झाडे,तालुका अध्यक्ष सविता चौधरी,माजी पंचायत समिती सदस्य भावना बावणकर,शहर अध्यक्ष गीतांजली थुटे,वैशाली शेंडे,दिक्षा भगत,चंदाताई कारेकर,सुरेखा सेंबेकर,शहनाज अन्सारी,सोनाली बिंगेवार,सिमा लोखंडे,इंदिरा नंन्नावरे,विजय झाडे,अक्षय लांजेवार,श्रीकांत गेडाम,डेव्हिड मेश्राम,दुर्योधन वैद्य,नरेंद्र दांडेकर,संजय पाटील,भोजराज कामडी,भैया कोरेकार,नामदेव मेश्राम,उपस्थित होते.