रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर – शेतकरी वर्ग वर्षाची बारा महिने शेतीच्या कामात व्यस्त असतात मात्र पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी बियाणे मिळणे आवश्यक असते यासाठी एक पाऊल पुढे टाकून तालुका कृषी कार्यालय व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती चिमूर अंतर्गत मौजा मालेवाडा येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप करण्यात आले.
यामध्ये बारा शेतकऱ्यांना प्रति शेतकरी तीन किलो धान बियाणे वाटप करण्यात आले सदर धान हा 90 ते 110 दिवसाचा असून वजनदार आहे. असे बीटीएम कन्नाके व आडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सोबतच बुरशीजन्य किटकनाशके व खत देण्यात येईल असे सांगितले. उमेद तर्फे अर्चना बोनसुले बी.एम.एम., हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, प्रीती डोंगरे कृषी व्यवस्थापक व शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते.



