वाद म्हणजे भांडण,व्यावहारिक भांडण हे देण्याघेण्यामुळे होते,तर वैचारिक भांडण हे एकमेकाचे विचार पटत नसल्यामुळे होते.आर्थिक ,सामाजिक , राजकीय ,धार्मिक क्षेत्रात व्यवहारिक आणि वैचारिक भांडणे असतात,आहेत.म्हणजेच वाद आहेत,म्हणजेच मतभेद आहेत,म्हणजे मतैक्य नाही.वैचारिक दृष्टिकोन म्हणजेच विचाराचे भांडण.,वाद.
असाच वैचारिक वाद हा ईश्वर आत्मा आणि धर्म याबद्दल आहे,नास्तिक तर हे काहीच मानीत नाहीत,त्यांना वगळून जरी विचार केला , तरी आस्तिक लोकात ईश्वरवाद ,धर्मवाद,आणि आत्म्याचा वाद आहे.म्हणजे अलग अलग दृष्टिकोन आहेत,यामुळे केवळ वैचारिक भांडणे करून न थांबता ,म्हणजे शाब्दिक भांडण न करता डायरेक्ट हाणामाऱ्या होतात,लाठ्याकाठ्यांचा वापर करतात,डोके फोडून घेतात,हातपाय मोडून घेतात,पोलिस, जेल हे सारे हिंसेचे प्रकार घडतात.यावरून दोन देशांची मोठमोठी धार्मिक युद्धे पण व्हायला लागलीत,ही फार मोठी शोकांतिका आहे.खरे तर वैचारिक मतभेद आणि त्यातून निर्माण होणारी भांडणे ही विचारानेच आणि वैचारिक पातळीवरच मिटविली पाहिजेत.म्हणजेच विचाराची लढाई ही विचारानेच करायची असते.पण ” जिसका दिमाख चलता नहीं उसका हात चलता है ” या म्हणी प्रमाणे कमी बुध्दीची च माणसे मारामाऱ्या करतात,हे सिद्ध होते.असो.आपला चिंतनाचा विषय आहे,ईश्वरभेद आणि धर्मभेद.
ईश्वरामुळेच हे अनेक धर्म निर्माण झाले.अजूनही ईश्वर कुणी जाणला नाही,फक्त मानला. तसेच धर्म कुणी जाणला नाही,तर केवळ तो मानला.असे का ? असा प्रश्न केला तर आस्तिक विचारवंत म्हणतात की,” ईश्वर ” ही जाणण्याची गोष्ट नव्हे तर केवळ मानण्याची गोष्ट आहे.कारण त्याची जाणीव होत नाही,आणि त्याचे अस्तित्वही सिद्ध करता येत नाही,म्हणून केवळ मानूनच स्वीकारायचे असते.आत्म्याचे पण तसेच आहे.धर्माचे पण तसेच आहे.याचा अर्थ धर्म म्हणजे धारणा, धारण करणे म्हणजे केवळ मानणे होय.कारण देव आत्मा,धर्म हे दिसत नाहीत आणि जाणवत पण नाहीत.जसे हवा दिसत नाही तरी जाणवते.असे पण यांचे नसते.म्हणून तर्क अनुभव,प्रयोग करून पण या तीन गोष्टी सिद्ध करून दाखविता येत नाहीत.म्हणून केवळ मानूनच जीवनातील कोडे सोडवावे लागतात,प्रस्न,समस्या मिटतात.असे आस्तिक विचारवंत आणि दार्शनिक म्हणजे तत्वद्द्यानी म्हणतात.जे नास्तिक विचारवंत केवळ हा ” मानण्याचा ” सिद्धांत मान्य करीत नाहीत.ते म्हणतात बाप जिवंत असेल तर दाखव नसेल तर श्राध्द कर.” असे जेंव्हा म्हणतात तेव्हा आस्तिकांची गोची होते.अशावेळी ते चुप्पी साधतात, मौन धारण करतात, ध्यानस्थ होतात.असो.
ईश्वरवाद म्हणजे एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद.आस्तिक विचारवंतात ईश्वराबद्दल मतभेद आहे,काहीजण म्हणतात ” ईश्वर अल्ला गॉड ” हा एकच आहे,त्याला अनेक भाषेत अनेक म्हणा पण तो एकच आहे,असे म्हणणे हे धर्मानुसार पण आहे.कारण इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म हा ईश्वर एकच आहे,अनेक नाहीत,त्याचे अनेक अवतार पण नाहीत,देव हा देवच आहे,म्हणून कुणी स्वतःस भूदेव म्हणणे चुकीचे आहे.
इस्लामधर्म अवतार मानीत नाही,मूर्तिपूजा पण मानीत नाही,ख्रिश्चन धर्माची पण मान्यता ( मानणे ) अशीच आहे.आणि हे दोन्ही धर्म चतुर्वर्ण आणि जातीव्यवस्था आणि त्यातील अस्पृश्यता मानीत नाहीत.सर्व माणसे सारखीच आहेत.माणसामाणसात भेद करीत नाहीत,उच्च नीच आणि श्रेष्ठ कनिष्ट असा भेदभाव करून अन्याय छळ करीत नाहीत,हे सारे वैदिक ब्राम्हण ( जे हिंदू धर्माचा मुखवटा लावतात ) धर्मात यास मान्यता आहे.नुसतीच मान्यता म्हणजे ऐच्छिक नव्हे तर कम्पल्सरी आहे.मनुस्मृती या संविधानाचे कायदेनुसार हे चालते.म्हणूनच हिंदू धर्मातील अस्पृश्य जाती आणि शूद्र ( ओ बी सी) हे मुस्लिम ख्रिश्चन जातीत जायला लागले.म्हणून वैदिक धर्ममार्तंडानी एकेश्वरवादी संप्रदाय उदा.वारकरी,मनुभवपंथ , आर्यसमाज,प्रार्थना समाज, असे काही संप्रदाय निर्माण करून ” अनेक ईश्वर वाद सोडा आणि कोणत्याही एकाच देवास माना,पण हिंदू धर्म म्हणून एकच रहा,धर्म सोडू नका.शिवाय या संप्रदायांनी समरसतेची भूमिका घेतली,म्हणजेच जाती असू द्या पण त्यात भेदभाव आणि अस्पृश्यता बाळगू नका,असे तत्वद्न्यान या साम्रदायानी,पंथानी स्वीकारल्या मुळे धर्मांतर थांबले.आणि हिंदू म्हणजेच वैदिक ब्राह्मणी धर्म मरता मरता वाचला.यामुळे रोटीबंदी उठली तरी बेटीबंदी उठली नाही,म्हणजेच जातीव्यवस्था कायम राहिली.अलीकडे संविधानाने रोटीबंदी अस्पृश्यता कायद्याने बंद केली,पण बेटी बंदी कायद्याने उठवली नाही,म्हणून जाती व्यवस्था तशीच राहिली.फक्त अन्याय अत्याचार कमी झाले.( नष्ट नाही झाले ). वैदिकांनी अनेकेश्वर वाद सोडला आणि एकेश्वरवाद स्वीकारला,याचे कारण धर्मांतर हे आहे.
आत्मा हा फक्त जीवात असतो,निर्जीवात नसतो.म्हणजेच पशु पक्षी वनस्पती माणसात असतो,आणि आत्म्यात परमेश्वर असतो,म्हणून ” कुणाही जीवाचा न घडो मत्सर ” असे आत्मवादी संत म्हणाले.तसेच ईश्वर केवळ आत्म्यातच नसतो तर तो निर्जीव वस्तूत पण असतो,म्हणून ईश्वर हा चराचरात सामावलेला आहे.ईश्वर नाही अशी जागाच नाही.आणि जगही नाही,कोणता देशही नाही.अशी व्यापक भूमिका विचार मांडणारे विचारवंत आणि संत झाले, आणि अजूनही आहेत.तसे कथा कीर्तन प्रवचन सत्संगातून नेहमी प्रचार चालूच असतो.म्हणून एकेश्वरवादी असो की अनेकेश्वरवादी असोत,ईश्वर आणि आत्मा प्रत्येक धर्मांची मान्यता आहे.याचा अर्थ ईश्वर आत्मा हे सारेच धर्म मानतात,पण जाणतात असे नाही.म्हणून सारेच धर्मात ईश्वर आणि आत्म्या बद्दल ची जी श्रद्धा आहे ती अंधश्रद्धाच आहे,असेच म्हणावे लागते.
शेवटी धर्म एकच का नाही ? देव एकच का अनेक ? आत्मा म्हणजेच परमेश्वर की आत्म्यात परमेश्वर ? हे वाद आस्तिक लोकात आहेतच,आणि राहणारच.कारण व्यक्ती तितक्या प्रवृती,आणि प्रवृती तितके स्वभाव,आणि स्वभाव तितके अनेक वागणे,आणि व्यक्ती तितुके विचार हा तर निसर्ग नियमच आहे,यात बदल होत नाही.निसर्ग नियम बदलत नाहीत,पण मानवाचे विचार बदलतात,म्हणून मानव निर्मित जी आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक विषमता आहे,ती मात्र नक्कीच बदलता येते.त्यासाठी फक्त प्रामाणिकपणे विचार करण्याची गरज आहे.


