दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, आळंदी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजिलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
रिसर्चचे या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, योगप्रशिक्षक व इंद्रायणी हॉस्पिटलचे कॅन्सर रिसर्च तज्ज्ञ डॉ. जयदीप भोसले, भाजपा आळंदी शहर मंडळाच्या अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेवक अशोक उमरगेकर, संजय घुंडरे (पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडी), नगरसेविका रुक्मिणी कांबळे, मंगल हुंडारे, ॲड.आकाश जोशी, शुभम धुर्वे, वासुदेव तुर्की, प्रितम किर्वे, भागवत महाराज, परमेश्वर महाराज, बंडू पालवे, विशाल थोरवे यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी केली. त्यांनी प्रशालेतील उपक्रम आणिसाजरी योगदिनाचे महत्त्व विशद केले. वैशाली शेळके यांनी २१ जून हा दिवस योगदिन म्हणून का साजरा केला जातो, याची भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. संजय घुंडरे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या योगसंपन्नतेची ओळख करून दिली.
सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या मनोगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून संपूर्ण देशभर योग दिन कसा साजरा होतो याचे वर्णन करताना भारतीय प्राचीन योग परंपरेची उजळणी केली. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या योगमहात्म्याचे वर्णन करत संत परंपरेतील योग साधनेचा गौरव केला.
योगप्रशिक्षक डॉ. जयदीप भोसले यांनी योगाचे शास्त्रीय महत्त्व पटवून देत प्राणायाम, सूर्यनमस्कार, कपालभाती, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भ्रमरी इत्यादी योगासने विद्यार्थ्यांकडून करून घेतली. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाचे नियोजन निशा कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रतिभा भालेराव यांनी केले. यशस्वीतेसाठी काळे वर्षा, चव्हाण राहुल, राजू सोनवणे व अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता भक्तिभावाने माऊलींच्या पसायदानाने झाली.
योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम शाळेच्या अध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा ठरला.



