ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
नागझिरा रोड कडे मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजेस आहेत आता शाळा कॉलेजेस दोन-चार आठ दिवसात सुरू होणार आहेत तिथं डॉ ब्रह्मानंद करंजेकर बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत विविध विद्यालय आहेत.
डीएड कॉलेज आहे , फार्मसी आहे, नवजीवन विद्यालय आहे बीपी एड, एम पी एड ,इंजिनिअरिंग कॉलेज, त्या रस्त्याकडे जाणारी बौद्धकुटी आहे, नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे आणि लिंबोनी नगर आहे एवढा रहदारीचा रस्ता असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत की साधा सायकल स्वार सुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाही.
लहान मुलं बाळ जातात रोडची गिट्टी निघालेली आहे मोठ्या फोर व्हीलर गाडीवर उसळतो आहे त्यामुळे रस्त्याचे दुरुस्ती करून एक पर्मनंट सिमेंट रस्ता करून रस्त्याचे रुंदीकरण होणे जरुरी है अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे डी जी रंगारी, तनुजा नागदेवे, जगदीश रंगारी शितल नागदेवे, यादोराव गणवीर, गणेश गजभिये , अमीत नागदेवे ,व उत्तामा गडपायले ,स्वर्णमाला गाजभिये व इतर कार्यकर्त्यांनी केलेली आहे.



