वारकरी संप्रदाय हा बहुजन संताचा.संत नामदेव महाराज यांनी स्थापन केला.या संप्रदायाचा मूळ उद्देश सामाजिक समता स्थापित व्हावी हाच आहे. कारण परकीय आर्यब्रम्हणांनी आपला विषमतावादी वैदिकधर्म बहुजनांवर लादला.हिंदुधर्माचा मुखवटा लाऊन वैदिक ब्राम्हण धर्माचे कार्य सुरू केले.या धर्मात सामाजिक विषमता होती,अजूनही आहे,याचा अर्थ वैदिक ब्राम्हण हिंदुधर्मात रोटीबंदी आणि बेटीबंदी आहे.
वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था आहे,म्हणजेच उच्चनीच,कनिष्ठवरीस्ट,अस्पृश्यता आहे,15 टक्के अभिजन आणि 85 टक्के समाज बहुजन यात अभियानाची मक्तेदारी, वर्चस्व,श्रेष्ठत्व,आणि त्यांचेकडून बहुजनांचे शोषण,अभियानाची राजकीय सत्ता,सामाजिक वर्चस्व, अशी व्यवस्था निर्माण केली.आणि अजूनही आहे,बहुजनांना स्वातंत्र्य समता न्याय नाकारणारा आणि विषमतावादी मनुस्मृतीचे संविधानानुसार चालणारा हा वैदिकब्रम्हण धर्म.या धर्माला नाकारणारा आणि या धर्मावर वार करणारा हा वारकरी संप्रदाय.बहुजन संताचा हा वारकरी संप्रदाय.मुळात समाजवादी आणि समतावादी,
हिंदुधर्माचा मुखवटा घातलेला वैदिकधर्मात अनेक ईश्वर आहेत,आणि वारकरी संप्रदाय हा फक्त एकेश्वरी विचार मांडतो,ईश्वर एकच असून विश्वातील सारीच माणसे हे त्याचेच लेकुरे आहेत,म्हणून देवाजवळ आर्थिक सामाजिक भेदभाव नाही,आपण सारे एकाच देवाची लेकरे असून आपल्यात जातीभेद आणि शिवाशिव का? असा प्रश्न या वारकरी संप्रदाय ने वैदिक धर्माला विचारला,म्हणून अभिजनांची आणि अभिजन संतांची भंबेरी उडाली.तळपायाची आग मस्तकात गेली.
त्यांनी आपल्या बहुजन संताचा आणि महामानवांचा धिक्कार केला,बहुजन म्हणजे शूद्र लोकांना म्हणजे obc,sc,st, यांना देव आणि धर्माचा अधिकार नव्हता,देवाजवळ जाण्याचा आणि धर्मप्रचार करण्याचा अधिकार मनुस्मृतीच्या कायद्यानुसार फक्त ब्राह्मणांनाच होता,त्यांचा हा अधिकार हक्क बहुजन संत नामदेव,तुकाराम,सावता, चोखा , नरहरी ,जनाबाई,अशा बहुजनांच्या संतांनी हिरावून घेत असल्यामुळे आणि सारा बहुजन समाज अभिजन संत,महाराज,पुजारी,धर्ममार्तंड यांना सोडून यांच्याच मागे लागल्यामुळे,शिवाय यांचे गुरुपदास धोका निर्माण झाल्या मुळे ,या बहुजन संताचा पण छळ करणे सुरू केले, कपट कारस्थाने करून या संतांचा काटा काढण्यापर्यंत वैदिक ब्राम्हणांची मजल गेली.
विषमतावादी धर्माने एका ईश्वराचे अनेक केले,त्याचे अवतार बनविले,अनेक देवदेवता निर्माण करून, चारवेद,सहा शास्त्रे,अठरा पुराण निर्माण करून 85 टक्के बहुजनांच्या डोक्यात घुसविले,अनेक अंधश्रधा निर्माण करून देवाची आणि धर्माची दहशत भीती बहुजनात निर्माण केली,स्वर्ग नरक,पापपुण्य, देव राक्षस,दैवभाग्य,अशा खुळचट,खोट्या कल्पना बहुजनांच्या डोक्यात ठोकून ठोकून बसविल्या.
अनेक देव त्यांची पूजा आरती,नवस सायास, तीर्थस्थान,तीर्थाटन, वाऱ्या फेऱ्या, सपते भंडारे,इत्यादी कर्मकांडे करायला लाऊन भटजी शेटजी बहुजनांची आर्थिक पिळवणूक करायला सुरुवात केली,ती देवाच्या आणि धर्माच्या नावाने.ही पिळवणूक थांबविण्यासाठी ,विषमता नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी,जातीभेद,अस्पृश्यता मिटवण्यासाठी बहुजन संतानी या व्यवस्थेवर वार करण्यास सुरुवात केली,यांचेशी धार्मिक युद्ध छेडले,याला उघड उघड प्रतिकार करणे हे ब्राम्हण संताना शक्य नव्हते,म्हणून ब्राम्हण संत पण या वारकरी साम्रदायात घुसून समरसतेची भूमिका घेतली.
एकनाथ महाराजांनी आळंदीची समाधी शोधून काढली,तेथे माऊलीची जयंती पुण्यतिथी आणि पंढरपूर वारीची पालखी सुरू केली,बहुजनात मिसळण्याचा हा प्रकार आणि प्रयत्न होता,बहुजन संतांच्या मागे सारे बहुजन लागले,शिवाय हे संत विषमता,अंधश्रद्धा,आणि अनेकेश्वरवाद ,कर्मकांड यावर सडकून टीका करू लागले,वैदिक हिंदुधर्माचे ठेकेदार पुरोहित महाराज कीर्तनकार यांचे धाबे दणाणले,यांचे वर्चस्व,श्रेष्ठत्व कमी व्हायला लागले,म्हणून वैदिक संतानी आपली कठोर भूमिका बदलून समरसतेची भूमिका घेतली,ते पण हिंदुधर्मातील अस्पृश्यता भेदभाव नाहिसा व्हायल पाहिजे म्हणून तसे कीर्तन भजन पण करायला लागले,पण वर्णाश्रम ,जातीव्यवस्था,विषमता याविरुद्ध बोलणे टाळले,फक्त आपण सारे एक,भाऊ भाऊ.एव्हढीच भूमिका घेतली,पण चातुर्वर्ण आणि जातीयता टिकवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले.
वैदिक ब्राम्हण संतानी वारकरी साम्रदायात घुसखोरी केली,त्यामुळे या वारकरी संप्रदायात दोन प्रवाह निर्माण झाले,एक पुरोगामी परिवर्तनवादी बहुजन संताचा वारकरी संप्रदाय,आणि दुसरा प्रवाह म्हणजे प्रतिगामी अभिजन संतांचा वारकरी संप्रदाय.आणि सारा बहुजन समाज आणि वारकरी जो ” रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग , यारे यारे लहान थोर,याती नर आणि नर,भेदाभेद अमंगळ” असे म्हणणारा बहुजन वारकरी म्हणजे विषमतेवर वार करण्याऐवजी फक्त वारी करू लागला,बहुजन संताचा वॉर म्हणजे युद्ध करणारा वार करणारा वारकरी आपली पुरोगामित्व ची तलवार म्यानात घालून आता फक्त टाळ आणि टाळ्या वाजवित बसला,कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी म्हणून शेतातील कामे,पेरणी सोडून त्यास वारी महत्त्वाची वाटू लागली,वैदिक धर्मावर वार करण्या ऐवजी त्याच धर्माच्या आदेशानुसार पूजा पाठ,हरिपाठ,कर्मकांड,तीर्थयात्रा करीत बसला,याचा अर्थ वैदिक धर्माचे संत या वारकरी संप्रदायात घुसून हा संप्रदाय संपविला.फक्त नावापुरता राहिला.
बाटली तीच नाव तेच पण महत्त्वाचे म्हणजे आतील समतेचे औषध काढून त्यात विषमतेचे औषध भरले.म्हणजेच इथे आपल्या सर्व बहुजन संताचा हा पराभवच म्हंटला पाहिजे.कारण आपले संतानी एकच ईश्वर आहे,तो सर्वत्र व्यापून आहे,आत्म्यात आहे,त्यास कशाला स्वर्गात आकाशात ,देवळात शोधतो? तीर्थी धोंडा पाणी ,देव रोकडा सज्जनी,म्हणजे सज्जन लोकात असतो,शेंदूर लाऊन धोंडा पूजती पोरे रांडा,परोपकार म्हणजेच पुण्य,असे गाडगेबाबा,तुकाराम, नामदेव,सावता या संतानी सांगितले,पण बहुजन त्यांचे न ऐकता अनेक देव आणि त्यांची पूजा अर्चा कर्मकांड,नवस वारी यात गुंतले,म्हणजेच ब्राम्हण संत ज्यांनी विषमता अस्पृश्यता जातीयता टिकविण्यासाठी प्रयास केला,त्यांचेच ऐकले,समतावादी पुरोगामी संतांचे नाही ऐकले,आजचा वारकरी हा ” वॉर आणि वार” करणारा नसून ” वारी ” करणारा आहे,गळ्यात माळ,हाती टाल,कपाळी बुक्का,खांद्यावर पताका,आणि न चुकणारी वारी,एवढ्याच पुरता शिल्लक राहिलाय.वारकरी संप्रदायाचे ध्येय कार्य विसरला ,श्रमात देव आहे,हे पण विसरला,आणि कामधाम सोडून ब्राम्हण संतांचे मागे लागून परत बरबादी ची वाट धरला आहे.
वारीला जातो याचे कारण नवस म्हणजे अंधश्रद्धाच.कर्मकांड म्हणूनच,अभंग म्हणतो विषमतेचे,देव मानतो अनेक,” मुखी नाम हाती काम ” हे वारकरी संप्रदायाचे मूळ विचारच विसरला. एकाच देवास न मानता बालाजीस पण जातो,काशीला पण जातो,रामेश्वरला पण जातो,गडचंद्याला पण जातो.मग कसला तू वारकरी? श्रीमंत लोकांना सारे देव करणे शक्य आहे,कारण त्यांच्याकडे अवैध म्हणजे पापाचा पैसा आहे,तोच देवाला देऊन परत अजून मिळू दे,म्हणून तेथे जातात,ते एकही देव सोडत नाहीत,त्यांचे अनुकरण तू गरीब माणूस का करतो बाबा? ते काय थोडेच वारकरी आहेत? एकच देव मानायला? तुझ्यासारखे.?
वारकरी संप्रदायात मूर्तिपूजा अजिबात नाही.कारण हा पंथ निर्गुण निराकार ईश्वर आहे अशी यांची मान्यता आहे,म्हणून खरा भक्त तोच आहे, जो मूर्तिपूजा करीत नाही.फक्त एकांतात दोन हात जोडून त्यावर एक मस्तक ठेवले म्हणजे झाली पूजा.देवाला काहीच अपेक्षा नसते.देव म्हणजे देणारा,आणि दैत्य म्हणजे घेणारा असतो.या विश्वातील सारे काही त्याचीच निर्मिती आहे,म्हणून फुल हळद गंध पाणी फळ त्याचेच त्याला देणे म्हणजे आपले देणे नव्हे.त्याची फक्त कृपादृष्टी आणि आईवडील थोरामोठ्यांचा आशीर्वाद एव्हढीच अपेक्षा करायची असते,त्यास फक्त मुखी नाम हाती काम पाहिजे,दोन हस्तक एक मस्तक नमस्कार करायला बास्स आहेत” आणिक ना काही पाहिजे देवा” हे तत्वद्न्यान वारकरी संप्रदायाचे आहे. सोंग ढोंग कर्मकांड,पूजापाठ,तीर्थयात्रा या संप्रदायात नाही.हे समजून घेऊन ब्राम्हण संतांच्या मागे न लागता बहुजन संत जे समतावादी आहेत,यांच्या पाठीमागून किंवा सोबत असले पाहिजे,तरच तो वार करी आहे,अन्यथा नुसता वारीकरच समजावा.


