Home Vidarbha साकोली – कोसमतोंडी – खोडशिवनी मार्गावरील बसेस किन्ही बस स्थानकापर्यंत आणा… —...

साकोली – कोसमतोंडी – खोडशिवनी मार्गावरील बसेस किन्ही बस स्थानकापर्यंत आणा… — ग्रामपंचायतने दिले आगर प्रमुखांना निवेदन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : साकोली- कोसमतोंडी व साकोली -खोडशिवनी मार्गावरील सायंकाळी सहा वाजेनंतरच्या सर्व बसेस ग्रामपंचायत किन्ही बस स्थानकापर्यंत आणण्याचे निवेदन साकोलीचे आगार प्रमुख सचिन आगरकर यांना ग्रामपंचायत तर्फे देण्यात आले. 

        साकोली कोसमतोंडी मार्गावरील किन्ही हे गाव मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर अंतर असून सायंकाळी सहा वाजेच्या नंतर या बसेसने वृद्ध, निराधार, अपंग, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असतात किन्ही हे गाव एक किलोमीटर आत असल्यामुळे बऱ्याच वेळेला सायंकाळी सहा वाजेनंतर या सर्व प्रवाशाची बरीच गैरसोय होत असते त्यांच्या सुरक्षेच्या मोठा प्रश्न उद्भवतो त्यामुळे सायंकाळी सहा वाजे नंतरच्या सर्व बसेस ग्रामपंचायत कार्यालय किन्ही बस स्थानकापर्यंत आणण्यात याव्या या मागणीचे निवेदन देण्यात आले.

       यावेळी किन्हीचे सरपंच घनश्याम पारधी उपसरपंच उमेश राउत व अनेक नागरिक उपस्थित होते.