Home Maharashtra साकोलीतील अमराई परिसर विकासापासून वंचित…

साकोलीतील अमराई परिसर विकासापासून वंचित…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : नगरपरिषद मधील आमराई परिसर व प्रभाग क्रमांक सहा आजही विकासापासून वंचित आहे. येथील कच्चे व खड्डे पडलेले रस्ते नालीसफाई नाही.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच पावसाळा सुरू झाला असून या प्रभागातील नालीसफाई झालेली नाही.

        यामुळे पाऊस आल्यास नालीतून वाहणारा पाणी हा रस्त्याने वाहतो आणि परिसरात दुर्गंधी होते साफसफाई नसल्यामुळे जागोजागी पाणी साचतो यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच आजार वाढण्याचे प्रमाण वाढत आहे.शहरातील अमराई परिसर हा अंधारातच आहे.

          या प्रभागातील नगरसेवक हे सत्ताधारी पक्षाचे होते परंतु या नगरसेवकांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात एकदाही प्रभागात फेरफटका मारलेला नव्हता त्यामुळे यांना समस्येचा भान नव्हता फक्त ठेकेदारी करणे आणि नगर परिषदेच्या खुर्च्या मोडणे एवढेच काम या नगरसेवकांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात केले यांनी जनतेच्या समस्यांना दुर्लक्षित करून फक्त आपला स्वार्थ साधला. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत या सत्ताधारी पक्षाला यांची जागा दाखवु व यांना घरी बसवू अशी नागरिकांत चर्चा रंगू लागली आहे.

प्रतिक्रिया –

१)आमराई ते तलाव वार्डपर्यंत दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात यावी पावसाळा सुरू झाला की येतील नागरिकांना ये-जा करण्यात भीती वाटते कारण जंगली जानवर या रस्त्यावर वावरत असतात त्यामुळे रस्त्यावर दिवाबत्ती तसेच रस्ता व नालीची व्यवस्था करून घ्यावी…

किशोर बावणे सामाजिक कार्यकर्ता

२) मागील तीन ते चार वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासक राज सुरू आहे येथील मुख्याधिकारी हे साकोलीत राहतात की बाहेर या प्रभागात आजपर्यंत लक्ष दिले नाही आमच्या समस्या सोडवा अन्यथा नगर परिषद समोर आंदोलन करू.

संतप्त नागरिक