ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : दिनांक १७ जुनला शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाची साकोली तालुका व साकोली / सेंदूरवाफा आगामी नगरपरिषद च्या निवडणुकीच्या अनुषंगाने विश्राम गृह साकोली येते आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सदर बैठकीला नवनियुक्त जिल्हाप्रमुख पदमाकर बावनकर, नवनियुक्त साकोली विधानसभा संघटक उमेद् घोडसे, बाळाभाऊ शिवणकर, उमेश गायधनी प्रामुख्याने उपस्थित होते…
सदर आढावा बैठकीच्या माध्यमातून साकोली/ सेंदूरवाफा नगरपरिषद च्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग निहाय आढावा घेण्यात आला. तसेच पक्षाचा विस्तार करण्याकरिता सदस्य नोंदणी अभियानावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला राधेशाम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे,सुरेश गजापुरे,सचिन घोन्मोडे,सचिन करंजेकर,विशाल कोसरे,निशांत कुडेगावे,विवेक काशीवार,तुषार जांभूळकर, प्रज्वल गभने,पुनीत फटिंग,प्रेमराज सोनवाने, प्रणय कांबळे,सौरभ वैद्य, धम्मदीप वैद्य, संदीप पंचभाई, निलेश मेश्राम,विजय मेश्राम,महेंद्र जनबंधू, महेश भदाडे,दीपक उनोने,देवेंद्र रोकडे,श्याम घोरपडे,पुष्पा सोनकुसरे,प्रमिला गोटेफोडे,आत्माराम सोनकुसरे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…..



