Home Political विधानसभेला पराभव झाला म्हणून निराश होऊ नका,आळस झटकून कामाला लागा… —...

विधानसभेला पराभव झाला म्हणून निराश होऊ नका,आळस झटकून कामाला लागा… — जिल्हा परिषद,पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवू :- खासदार प्रणिती शिंदे…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

        मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवेढा हॉटेल सुगरण येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

      यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीला जे वातावरण होते ते वातावरण आत्ताही आहे.विधानसभेला पराभव झाला म्हणून निराश होऊ नका,आळस झटकून कामाला लागा,जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण काँग्रेसचा झेंडा फडकवू….

           आपल्या मंगळवेढा तालुक्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे कोणतेही काम असू द्या,तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून जर तुमचे काम होत नसेल तर तुम्ही दिलेल्या अर्जाची एक प्रत माझ्याकडे द्या.सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून मी आपल्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करेन असे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शब्द दिले. ‌‌ यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी सांगितले की २४ गावचा सिंचन योजना पूर्ण व्हावी यासाठी खासदार ताई प्रयत्नशील आहेत,त्यांनी लोकसभेमध्ये याबाबत आवाज उठवला आहे,म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील १८ गावांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा व्हावा,तसेच तालुक्यातील पडोळकरवाडी,लवंगी,मारोळी,सलगर,शिरनांदगी हे तलावे पावसाळ्यात भरून घ्यावीत अशी मागणी खासदार प्रणिती ताई यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तालुक्यातील शिष्टमंडळांना घेऊन केली आहे.

       तसेच लक्ष्मी दहीवडी तलाव,डोंगरगाव तलाव या तलावांचे खोलीकरण रुंदीकरण FSI कंपनीद्वारे सुरू केली असून ते काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

           याचबरोबर २४ गावातील विंधन विहिरीचे कामेही संस्थेमार्फत केली जाणार आहेत हे फार मोठे काम मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांमध्ये होणार आहे.तसेच २४ गाव उपसा सिंचन योजनेतून शिरसी हे गाव वगळले आहे.

         म्हैसाळ योजनेमधून मानेवाडी हे गाव वगळले आहे,या दोन्ही गावांचा या योजनेत समावेश व्हावा यासाठी खासदार प्रणिती ताई प्रयत्नशील आहेत.यावेळी मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे यांनी भविष्यात तालुक्यातील कामे करत असताना त्या भागातील नेत्यांना विश्वासात घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.        

       नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी अशी मागणी शहराध्यक्ष अँड.राहुल घुले यांनी केली.

           यावेळी महादेव धसाडे गुरुजी,शिवानंद कुरमुते,पंडित पाटील,परमेश्वर वाघमोडे,गुरुलिंग दोलतोडे,सतीश पडोळकर,राजाभाऊ मेथकुटे,लव्हाजी लेंडवे,दुर्योधन पुजारी,सोमनाथ माळी,सुपणर सर,अनिल पाटील,राहुल कांबळे,विनायक शिंदे,संगप्‍पा घोडके यांनीही मनोगत व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकिरण कोळेकर यांनी केले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष अँड.नंदकुमार पवार,तालुका अध्यक्ष प्रशांत साळे,मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे,शहर अध्यक्ष राहुल घुले,नितीन पाटील,गुलाब थोरबोले,संभाजी गावकरे,शशिकांत बुगडे,जयश्री कवचाळे,दिलीप जाधव,सुरेश कोळेकर,यादाप्पा माळी,सचिन नकाते,रविकिरण कोळेकर,पांडुरंग जावळे,पांडुरंग माळी,काशिनाथ पाटील,भीमराव कांबळे,मुबारक शेख,अमोल म्हमाने,आयेशा शेख,पंडित पाटील बजरंग चौगुले,नामदेव डांगे,आबा पाटील,बापू अवघडे,सुनीता अवघडे,नाथा आयवळे,शहाजहान पटेल,सतार इनामदार,श्रीकांत पवार,डॉक्टर अंकुश कांबळे,शहाजी कांबळे,पांडुरंग निराळे,राजन ठेंगील,रविराज खडतरे,शितल कसबे,अनिल गायकवाड,राजकुमार ‌मेथकुटे,शंकरराव शिंदे,पांडुरंग ठोंबरे,गौतम कसबे,जगन्नाथ बोराडे,भाऊसाहेब हेंबाडे,भास्कर कसबे,सुखदेव गायकवाड,अमिना पटेल,सौ.अलका मस्के,समीर इनामदार,किरण हजारे,लखन माने,प्रदीप घुले,अर्जुन देवकर,संदीप बुरकुल,किरण घोडके,अमोल घुले,संदीप फडतरे,अजय विटकर,आकाश काळे,अविनाश धोत्रे,सिद्धेश्वर माने,सर्जेराव धोत्रे,प्रकाश चौगुले,प्रवीण चौगुले,अण्णासाहेब खडतरे,बंडू खडतरे,विनोद शिंदे,सिद्धनाथ चौगुले,विलास गवळी,सर्जेराव आखळे,महेश कटरे,आप्पासाहेब कटरे,नानासो कटारे,समाधान खडतरे,संग्राम दुधाळ,सिद्धेश्वर धसाडे,संजय कुमार कलाल,गणेश साबळे,ज्ञानेश्वर सोरडीकर,हरिदास चौगुले,विशाल कुंभार,नंदकिशोर शिंदे,गणपत आकडे,सुरेश शिरसागर,विशाल माळवे,अर्जुन शिंदे,रवी काटे,सागर पुजारी,रशीद मुलानी,विश्वास खळबट्टे,मनोहर ढवळे,भीमराव कांबळे,बाबुलाल मुजावर,जावेद मुजावर तसलीम,आकुंजी सिद्धांत,संजय चौगुले,विष्णू भंडगे,ईश्वर एजगर,आनंद रायभान,सतीश कुमार पडोळकर,अभिजीत पडोळकर,विनायक माळी,राजाराम देवकते,सत्यजित पळसे,पल्लू सरगर,सुपणर सर,कृष्णा सपकाळे,शिवाजी शिखरे,लक्ष्मण अवघडे,सुभाष जाधव,लक्ष्मण गायकवाड,संजय मस्के,शामराव मस्के,राहुल घायाळ,विकास शिलेदार,मंगेश मोरे,श्रीकांत पाटील,सुनील चव्हाण,सक्षम गावकरी,दत्तात्रय खांडेकर,विनोद खरे,किरण अकोला,दत्तात्रेय बाळगिरे,प्रकाश कांबळे,बाळू माने,इब्राहिम मुलानी,बाबासाहेब कसबे,अभिमन्यू तात्या बेद्रे,राजेंद्र पुजारी,बाबुराव पाटील,चंद्रकांत पाटील,राहुल मस्के,विक्रम शिंदे,श्रीशैल माळी,सौदागर खांडेकर,हनुमंत घुबरे,यशवंत आकळे,समाधान हेंबाडे,संतोष पुजारी,निसार पाटील,कपूर शेख,भीमराव पुजारी,भारत निकम,ताजुद्दीन पाटील,कृष्णात माने,पिंटू खडतरे,राहुल कांबळे,मदन घाटगे,रामसिद्ध चौखंडे,तुकाराम धायगुडे,राजू बिराजदार,राहुल शिंदे,बसवराज धायगोंडे यांच्यासह इतर पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.