युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांना वेध लागतात ते पेरणीचे सध्या विदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर पेरणीची कामे शेतक-यांनी सुरू केली असली तरी बाजारात बियाणे व खतांची कृत्रिम टंचाई असल्याने त्यांना कपाशी व इतर बियाणे हवी ती खते मिळेनाशी झाली आहेत. तर दुसरीकडे कृषी विक्रेते अजित 155 या बियाणांची दलालांच्या मदतीने काळ्याबाजारात विक्री करून मलिदा लाटत आहेत.
दर्यापुरात खते व बियाणांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार हा दरवर्षीच होत असतो अशातच दर्यापूर तालुक्यातील प्रतिबंधक असलेले बियाण्यां विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करून सुद्धा दर्यापूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक बियाण्यांची विक्री होत आहे.
दर्यापूर शहरात व ग्रामिण भागात खूप मोठ्या प्रमाणात होत असून सर्वत्र शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात तसेच ज्येष्ठ शिवसैनिक प्रदीप वडतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या दालनात प्रवेश करीत कृषि अधिकारी यांना घेराव घालून दर्यापूर तालुक्यात प्रतिबंधक बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी केली आहे तसेच अजित 155 या बियाण्यांची कृषी दुकानदार चढया दराने विक्री करत असल्याची दिसत आहे.
मूळ किमतीत बियाण्यांची विक्री करावी यासंदर्भात अजित 155 अजित 105 हे बियाणे दर्यापूर तालुक्यातील कोणत्या कृषि केंद्रात किती प्रमाणात साठा उपलब्ध आहे याची यादी रोज कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी केली. तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घालून विचारणा करण्यात आली आहे कृषी कार्यालय मध्ये अचानक आलेला शिवसेना पदाधिकारी यांचा मोर्चा येताच कृषी अधिकारी व कर्मचारी यांची दमछाक पहावयास मिळाली होती.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, शिवसेना विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख गोपाल अग्रवाल, ज्येष्ठ शिवसैनिक प्रदीप वडतकर, सरपंच किशोर टाले, सरपंच संजय कोरडे, सरपंच विजय आढाव, युवासेना जिल्हा चिटणीस, प्रतिक राऊत, युवासेना दर्यापूर तालुकाप्रमुख सागर गिरे, युवासेना दर्यापूर शहर प्रमुख रुपेश मोरे, युवासेना तालुका चिटणीस भरत हिंगणीकर, शिवसेना उप तालुका प्रमुख राजु मानकर, शिवसेना उपशहर प्रमुख दिपक बगाडे, शिवसेना उपशहर प्रमुख खंडू राऊत, उपसरपंच शरद आठवले, भास्कर धोटे, प्रशांत धर्माळे, प्रशांत ठाकूर, संदिप धर्माळे, भावेश कंटाळे, अनिकेत वाघझाळे, संतोष हागे, बादल सवाई, रामसिंग साळुंखे नितीन माहुरे, अमन पटेल, सोनू कपिले, अनिकेत सरडे, गणेश खंडारे, बच्चू पोटे, त्रीजय सावळे, ओम देवतळे, आकाश जवळकर, अमित गावंडे, अल्केश थोरात तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.



