ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : साकोलीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे सक्रिय युवा नेत्यांसह साकोली, लाखनी व लाखांदूर भाजपाचे प्रमुख पदाधिकारींनी भंडारा येथे ( रवि. ०८ जून ) ला शिवसेना ( शिंदे ) गटात प्रवेश घेतला. यामुळे साकोलीत भाजपामध्ये खळबळ उडाली असून असे का झाले.? यावर भाजपा मात्र चिंताग्रस्त स्थितीत आलेली आहे.
साकोली भाजपाचे सक्रिय युवानेते राधेश्याम मुंगमोडे, तीनदा महामंत्री असलेले नरेंद्र वाडीभस्मे, सुमित लंजे, रवि कापगते, प्रेमराज सोनवाने, तुषार जांभुळकर, प्रज्वल गभणे, शुभम गभणे, भागवत कापगते, अश्विन मेश्राम. लाखांदूर येथील यश खत्री, दिनेश लाडे, निकेश कांबळे, गोवर्धन गायधने. आणि लाखनी येथील पद्माकर बावनकर, बाळा शिवणकर, उमेश गायधनी, अमन निर्वाण, विनायक शेंडे, नितेश गायधनी व महेश भदाडे अश्या साकोली विधानसभा मतदारसंघातील २१ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना ( शिंदे ) पक्षाचे भंडारा गोंदिया समन्वयक संजय कुंभलकर व जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
इकडे साकोलीचे सक्रिय आणि दमदार युवा नेते राधेश्याम मुंगमोडे व दांडगा अनुभवाचे महामंत्री नरेंद्र वाडीभस्मे आणि युवा कार्यकर्ते अचानक भाजपा सोडून शिवसेनेत का गेले.? हे अचानक झाले कसे.? यावर आता साकोली भाजपात चिंताग्रस्त वातावरण असून शहरातील दमदार मानल्या जाणाऱ्या सक्रिय पदाधिकाऱ्यांच्या “भाजपाला जय महाराष्ट्र” प्रकरणाने मात्र साकोली राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपात सध्या भूकंप आला आहे.



