आजपर्यंतचा सर्वात निचांकी आणि निकामी भारतीय प्रधानमंत्री म्हणजे नरेंद्र मोदी होत…
कारण…
(1) पहिल्या पाच वर्षात म्हणजे 2014 ते 2019 मध्ये पायाला भिंगरी बांधून सर्व जग पालथा घालणारा.
कारण देशाला विश्वाचे दिशादर्शक बनवून विश्वगूरु बनण्याचे स्वप्न.त्यासाठी आमंत्रण नसतानाही बीनबुलाए मेहमान एकाच देशात अनेकवेळा जाणे.
(2) ज्या अमेरिकेने गोध्रा हत्याकांडामुळे दहा वर्षे नरेंद्र मोदी यांना आपल्या देशात प्रवेशबंदी केली होती.तेंव्हा यांनी तर प्रधानमंत्री बनल्यानंतर स्वाभिमानाने अमेरिकेचे अमेरिका भेटीचे आमंत्रण सुद्धा ठोकरायला पाहिजे होते!
परंतू ,व्हाईट हाऊस मधील 75% खासदारांनी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकलेला असतानाही ते तिथे भाषण देण्यास जातात…
याला काय म्हणावे?
(3) रशिया,चीन,अमेरिका,इंग्लंड,फ्रांस यासारख्या बलाढ्य देशाला अनेक भेटी देऊन सुद्धा ऑपरेशन सिंदूर नंतर भारत एकटा पडला आणि अमेरिकेने सिझफायरची घोषणा केली.
(4) आम्ही राफेलच्या भरवशावर राहिलो.पाकिस्तानने चीनच्या मदतीने आमचे राफेल पाडले.आता सिंदूर ऑपरेशन नंतर चीन पाकिस्तानला राफेलपेक्षा सरस प्रतिस्पर्धी असलेले लढाऊ विमान 50% डिस्काउंट मध्ये भेट देणार आहे.
हीच का आमची परराष्ट्रनीती…..?
(5) एकेकाळी काँग्रेसमुक्त भारत करण्याचा अजेंडा घेऊन प्रधानमंत्री बनणाऱ्या मोदीवर काँग्रेसच्याच नेत्यांना ऑपरेशन सिंदूर नंतर परदेशात पाठवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडण्यासाठी मदत घ्यावी लागते!
(6) अहो आमच्या देशावरील दहशतवादी हल्ला सोडा…….
1971 मध्ये आम्ही बांगलादेशच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तत्कालीन कणखर ( आयर्न लेडी) प्रधानमंत्री मा.इंदिरा गांधी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी सातवी लढाऊ युद्धनौका आम्ही पाकिस्तानच्या बाजूने तुमच्या विरोधात पाठवू अशी धमकी दिल्यावर इंदिरा गांधी यांनी याच निक्सनला सातवीच काय आठवी सुद्धा पाठवा,असे सडेतोड उत्तर दिले होते.त्या अमेरिकेच्या धमकीला घाबरल्या नाहीत.
कारण त्यांना बांगलादेशची बाजू घेऊन त्या देशावर हिटलर सारखा कब्जा करायचा नव्हता तर त्या स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करायची होती आणि पाकिस्तानला जगा आणि जगू द्या हेच ठणकावून सांगायचे होते.
(7) 11 वर्षात पत्रकारांच्यासमोर न जाणारा आणि गेलाच तर गोदीमीडियाच्या एक/ दोन पत्रकारांच्या ठरवलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा प्रधानमंत्री.
1959 मध्ये म.प्रदेशात 21 बालकांना एका रांगेत गोळ्या घालणाऱ्या गब्बरसिंगला जिवंत किंवा मुडदा पकडण्याची मागणी करणारे आणि त्याला संपवणारे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू.
आणि हे प्रधानमंत्री दोन वर्षांपासून जळत्या मणिपूरला भेट न देणारा प्रधानमंत्री….
(8) सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी मंडल आयोगाच्या अमल बजावणीसाठी प्रधानमंत्री पदाला लाथ मारणारे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नेल्सन मंडेला यांना “भारतरत्न ” ‘किताब देऊन गौरविले, आणि भारतरत्नची उंची वाढविणारे मा. व्ही.पी.सिंग साहेब .
आणि हे मोदी प्रधानमंत्री पदाला EVM चे फेविकोल लावून सामाजिक लोकशाही संपविणारे आणि सचिन तेंडुलकर सारख्याला भारतरत्न देऊन त्याची उंची गमविणारे हे मोदी प्रधानमंत्री.
(9) 2019 ते 2024 च्या काळात EVM सेटिंग करून देशातील सर्व राज्यसरकारे ताब्यात घेणारे.प्रसंगी तोडा/ फोडा आणि राज्य करा. शही कुटनीती अवलंबणारे RSS आणि भाजप अर्थात मोदी – शहा यांच्यामुळेच देश आणि महाराष्ट्र यांच्याच काळात कर्जबाजारी झाले.
परंतू ,2008 मध्ये जागतिक मंदी येऊन सुद्धा देशाला त्या मंदीतून सावरणारे तत्कालीन प्रधानमंत्री प्रसिद्ध अर्थतज्ञ मा. मनमोहन सिंग कुठे.
(10) आता या सर्वांवर एकच उपाय म्हणजे भारतीय जनतेने EVM + VVPAT कायमचे हटवून बॅलेट पेपरवरच पारदर्शक निवडणुका करवून घेणे. हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठीच प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत लढणे……



