Home Maharashtra साकोलीतील पत्रकारांना जिल्हास्तरीय पत्रकारीता सेवा पुरस्कार… — आशिष चेडगे, ऋग्वेद येवले,...

साकोलीतील पत्रकारांना जिल्हास्तरीय पत्रकारीता सेवा पुरस्कार… — आशिष चेडगे, ऋग्वेद येवले, डि. जी. रंगारी व दूर्गेश राऊत यांना मानचिन्ह प्रमाणपत्र…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ( ०९ जून ) ला “सन्मान द्या व सन्मान घ्या” उपक्रमांतर्गत अड्याळ चिचाळ येथे विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्यात साकोलीतील चार पत्रकारांना जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

       विदर्भ संपादक संजीव भांबोरे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने “सन्मान द्या व सन्मान घ्या” अश्या दिमाखदार सोहळ्यात उदघाटक “माझा मराठवाडा” छत्रपती संभाजीनगरचे संपादक दशरथ सुरडकर, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, अड्याळ सरपंच शिवशंकर मुनघाटे, सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, नागपूरचे “जनता टाइम्स” मिडिया संपादक निखीलेश कांबळे, शांतीवन बुद्ध विहारचे जीवनबोधी बौद्ध आणि सत्कारमूर्ती राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे हे उपस्थित होते.

      सदर सोहळ्यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांना “जिल्हास्तरीय पत्रकारीता सेवा पुरस्कार” शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले यांना विशेष सन्मानपत्र व संविधान प्रत, डि. जी. रंगारी पत्रकारिता आणि दुर्गेश राऊत यांना ग्रामीण पत्रकारिता पुरस्काराने मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी नुकतेच मुंबईत जाहीर झालेल्या नाट्य पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रक्तदान आणि नेत्र चिकित्सा तपासणी शिबिरही आयोजन केले होते. 

        सदर आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, दैनिक माझा मराठवाडा, जनता टाइम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी स्वागत सत्कार कार्य सांभाळले. येथे संचालन प्रा. राजेश नंदपूरे यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. अक्षय कहालकर, आशिष मेश्राम, अर्पित मेश्राम, कुलदीप गंधे, प्रमोद वासनिक, गुलाब घोडसे, विनय ढोके, संजय वंजारी, विलास बांडेबुचे व सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.