ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : ग्रामपंचायत एकोडीच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.गावातून जनजागृती रॅली काढून झाडे लावा झाडे जगवा, असे नारे देण्यात आले.रॅली संपल्यानंतर ग्रामपंचायत परिसर बाजार चौक मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच संजय खोब्रागडे ग्रामपंचायत अधिकारी गौतम खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले ,सुकराम बन्सोड, रहिला कोचे, अंगणवाडी सेविका रजनी चचाणे, नम्रता मेश्राम, मंगला भुरे, आशा वर्कर कृपा भैसारे, आय सी आर पी कविता भुरे, अंजुताई जांभूळकर, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप चौधरी, अमित भैसारे, शेसराज मेश्राम, अंगणवाडी मदतनीस निर्मला सोनवाणे, इंदूबाई शहारे, आनंदा पुसामे जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथील शिक्षिका जांभुलकर , करंजेकर मॅडम उपस्थित होते.



