शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा आंबोली गावातील शेतकरी श्री.दिलीप राखुंडे यांनी सन. 2021 या वर्षी शेतातील सिंचन सुविधांन्वये वीज डिमांड करीता 10 हजार 187 रुपये भरले होते व वीज कनेक्शनची मागणी केली होती.
त्यानंतर शेतकरी श्री.दिलीप राखुंडे हे mseb कार्यालयाला वारंवार भेट देऊन वेळेत वीज कनेक्शन देण्याची मागणी करत होते.
परंतु 2025 वर्ष उजाडल्यानंतरही त्यांच्या शेतात वीज पुरवठा कनेक्शन जोडणी चिमूरच्या एम.एस.ई.बी.कार्यालयाकडून करण्यात आली नाही.
यामुळे सिंचन सुविधांच्या अभावी 4 वर्षात त्यांच्या शेतीचे खूप मोठे नुकसान झाले.
डिमांड भरलेल्या रुपयांपैकी दी. 28/05/2025 ला त्यांना चिमूरच्या MSEB कार्यालयातून 8 हजार 700 रुपयांचा चेक देण्यात आला.म्हणजे तब्बल 1487 रुपये कट करून रुपये देण्यात आले.
विज जोडणीच्या नावावर चिमूर तालुक्यातील व महाराष्ट्र राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे करोडो रुपये सरकारने आपल्या घशात घातले असल्याचा अंदाज आहे.
इतके वर्ष शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळाले नसेल तर याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व गेल्या 4 वर्षात झालेली नुकसान भरपाई चिमूरच्या एम.एस.ई.बी.कार्यालयाकडून मिळावी अशी मागणी शेतकरी दिलीप राखुंडे यांनी केली.
तद्वतच ग्राहक मंच मध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाॅक्स….

चार वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन का म्हणून मिळाले नाही? यासंबधाने सखोल चौकशी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांवर उचित कारवाई व्हावी,याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी…



