Home सांस्कृतिक गुणगौरव सोहळा व सभेचे सेंदूरवाफात आयोजन…

गुणगौरव सोहळा व सभेचे सेंदूरवाफात आयोजन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :१ जून २०२५ ला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात भंडारा जिल्हा गुणगौरव सोहळा व जनरल सभेचे आयोजन – गजानन महाराज देवस्थान, सेऺदूरवाफा,येथे श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या स्व स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ जिल्हा भंडारा यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. 

         या जनरल सभेत संस्थांमार्फत आर्थिक वर्ष २०२५ -२०२६ या वर्षात करण्यात येणाऱ्या सेवेचे व कार्याचे नियोजन . व आर्थिक वर्ष २०२४ व २०२५ या वर्षात श्री संप्रदायातील पदाधिकारी, भक्तगण व कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिली त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पूर्व विदर्भ पिठाचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबई व नागपूर वरून येऊन मार्गदर्शन करणार आहेत.

        तरी भंडारा जिल्हा सेवा समितीच्या वतीने साकोली, भंडारा ,लाखनी, पवनी, तुमसर, मोहाडी ,लाखांदूर तालुक्यातील समस्त श्री.संप्रदायातील भाविक भक्तगण व पदाधिकारी यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.