शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या मौजा लोहारा येथील रहिवासी व
चिमुर येथील अँड.शनैशचंद्र जी. श्रीरामे यांचे वडील नामे गुलाबराव कैकाडु श्रीरामे (७२ वर्षे) लोहारा (बु.) यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजता दिर्घ आजाराने ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
सामाजिक कार्यकर्ता ओळख असलेले श्री.गुलाबराव श्रीरामे हे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ पदाधिकारी असुन त्यांनी आपल्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला गती देण्याचे कार्य केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,एक विवाहीत मुलगी,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लोहारा (बु.) येथील स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



