Home Vidarbha नयाकुंड टेकाडी व चारगाव येथे स्रोत बळकटीकारण वशाश्वतीकरण विषयक दि.-14 मे ते-15...

नयाकुंड टेकाडी व चारगाव येथे स्रोत बळकटीकारण वशाश्वतीकरण विषयक दि.-14 मे ते-15 मे असे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम शुभारंभ…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

पारशिवनी :- पंचायत समिती पारशिवनी, अंतर्गत ग्रामपंचायत न याकुंड, ग्रामपंचायत चारगाव, आणि ग्रामपंचायत टेकाडी (खदान) येथे जल जीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी व सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा यांचे संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तिन्ही ठिकाणी शुभारंभ करण्यात आले.     

     सदर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम…

      ग्रामपंचायत स्तरावरिल भागधारका साठी स्रोत बळकटीकारण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षना करीता चारगाव , नयाकुंड व टेकाडी येथे दोन दिवसिय प्रशिक्षण शिविर आयोजीत करण्यात आले असुन सदर कार्यक्रमाचे शुभारंभ प्रसंगी. 

             सदर प्रशिक्षणाला उपस्थित मान्यवर उमेश नैतामे पचायत संमिती,सहागट विकास अधिकारी, यशवंत खिलार विस्तार अधिकारी जितेंद्र अनकर आरोग्य पर्यवेक्षक मुनेश दुपारे समूह समन्वयक प्रणय गजभिये स्वच्छता सहाय्यक तसेच प्रवीण प्रशिक्षक आनंद पवार सर, वसंत वराडे सर, सुनील गजभिये सर, नलिनी शेरकुरे मॅडम, प्रांजल वाघ मॅडम, अंकुश बुरांगे सर, दिलीप दिवटे सर, हरिदास रानडे सर यांनी मार्गदर्शन केले.

            समन्वयक स्वप्नील जनबंधू आणि त्यांची टीम सदर प्रशिक्षणात अंतर्गत चारगाव, नयाकुंड व टेकाडी येथिल ग्रामपंचायत स्तरावरिल भागधारकासाठी स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण भूजल पुनर्भरणाची तंत्रे, भूपृष्ठभागावरील पाण्याची पुनर्भरण पद्धती, भूजल पुनर्भरणाच्या नदी नाले तंत्र या विषयावर वर प्रशिक्षकानी माहिती दिली.

       सदर प्रशिक्षणात प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच ग्राम विकास अधिकारी, अनुसूचित जाती महिला, जलसुरक्षक,अनुसूचित जमाती महिला व इतर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण शिबिरला उपस्थित होते.