बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
लक्ष्मी नरसिंह यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आजी-माजी सरपंच सर्व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नरसिंहपूर येथे निकाली कुस्त्याचे मैदान भरवण्यात आले.
नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील प्रसिद्ध देवस्थान व या भागाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान यांच्या जन्मोत्सवा निमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मैदान हजारो पैलवानांच्या उपस्थित भरवण्यात आले.
या कुस्ती आखाड्यामध्ये एक नंबरचे पैलवान सुहास घोडके यांनी पैलवान प्रसाद रास्ते यांचा पराभव करून विजय मिळवला तर दोन नंबरच्या कुस्तीमध्ये पैलवान नामदेव कोकाटे यांनी पैलवान सुमित मरगजे यांचा पराभव करून विजय मिळवला.
परंपरेपासून यात्रा उत्सव कमिटीने व नरसिंहपूर ग्रामस्थ यांनी कुस्ती मैदानाची परंपरा चालून ठेवून इनाम रुपये शंभर पासून ते इनाम रुपये दहा हजार पर्यंतच्या निकाली कुस्त्या या आखाड्यामध्ये लावण्यात आल्या.
कुस्ती मल्ल सम्राट ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान रावसाहेब मगर मगराचे निमगाव यांनीही आपली आखाड्यामध्ये हजेरी लावून 7216 वा मानाचा फेटाबांधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब (आप्पा)मगर या नावाची ओळख आहे.
कुस्ती मैदानामध्ये अनेक पैलवान व मान्यवर कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी हजेरी लावली याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा फोटा श्रीफळ हार देऊन सन्मान करण्यात आला.
कुस्ती आखाड्यामध्ये पंच म्हणून प्रमुख पैलवान बापूसाहेब कोकाटे, पैलवान आमर भैया जगदाळे, पैलवान युवराज केचे, पैलवान भैय्यासाहेब मगर, पैलवान सागर इंगळे, पैलवान अण्णासाहेब गायकवाड,सरपंच प्रशांत पाटील, पैलवान सोनूभैय्या पराडे,यांच्यासह सर्व पैलवानांनी पंच म्हणून आपली कामगिरी बजावली.
नामांकित पैलवानांनी कुस्ती जिंकून मानाची चांदीची गदा मिळवत आपला विजय मिळवला.
नरसिंहपूर येथील कुस्ती मैदानासाठी सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आदी भागातून कुस्ती मल्ल पैलवान तसेच बावडा पोलीस स्टेशनचे पीआय राऊत साहेब सर्व अधिकारी यांनीही उपस्थिती लावली.
लक्ष्मी नरसिंह यात्रा कमिटी व ग्रामस्थ विद्यमान सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष समस्त ग्रामस्थ यांनी लक्ष्मी नरसिंह उत्सवामध्ये आलेल्या भाविकांसाठी कोणतीही अडचण येऊ दिलेली नाही, आलेल्या भाविकांसाठी दररोज महाप्रसाद व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
चौकट
यात्रा उत्सवामध्ये गावच्या मानाचा फेटा हा विद्यमान सरपंच नितीन सरवदे यांना बांधून मल्ल सम्राट रावसाहेब मगर यांनी पुढील वाटचालीस सरपंच यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मल्ल सम्राट रावसाहेब मगर, बापूसाहेब कोकाटे, आमरभैया जगदाळे, आण्णासाहेब गायकवाड, भैय्यासाहेब मगर,प्रशांत पाटील, सोनुभया पराडे, निरा नरसिंहपुर गावचे विद्यमान सरपंच नितीन सरवदे,उपसरपंच गुरुदत्त गोसावी,नरहरी काळे, विठ्ठल देशमुख, आण्णासाहेब काळे,विलास ताटे, संतोष मोरे, उद्योजक सागर इंगळे,जगदीश सुतार,श्रीकांत दंडवते,चंद्रकांत सरवदे,दशरथ राऊत,आनंद काकडे, खजिनदार गणेश केसकर, विजय सरवदे,सचिन कदम,अरुण क्षीरसागर,प्रशांत बादले,गौरव दंडवते,नातासो मोहीते, प्रभाकर जगताप,यात्रा कमिटी अध्यक्ष राजेंद्र मोरे उपाध्यक्ष उमेश घोडके, अण्णा जगताप, दत्तात्रेय कोळी,सह आदी मान्यवर व ग्रामस्थ कुस्ती मैदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी निकाली कुस्ती मैदानाने श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान उत्साहाची सांगता झाली, कुस्ती मैदानाचे संपूर्ण समालोचक पैलवान युवराज केचे गारअकोले यांनी केले.
आभार प्रदर्शन माजी सरपंच विठ्ठल देशमुख यांनी मानले.



