ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली या शाळेने यंदाही दहावीच्या निकालात यशाची परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल 90.44 % लागले असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे.
प्राविण्य प्राप्त एकूण विद्यार्थी – 23, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी- 36, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 47 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
कु.अनिता राजेश्वर घरत हिने 92.20 % गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. निधी अरविंद सोनवणे हिने 89.40℅, व कु.डिंपल प्रदीप हत्तीमारे हिने 89.00℅ अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुख्याध्यापिका श्रीमती आर. बी. कापगते व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश साध्य झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती, विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.



