शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील श्रावस्ती बुद्ध विहार परिसरात विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तथा त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्य अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय मंडळ नेरी द्वारा आयोजित परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी डॉ.बाबासाहेब व माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले व त्यांच्या जिवन चारित्र्यावर आणि कार्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.रेखाताई पिसे होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून लोकसेवा दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव प्रा.राम राऊत,काँग्रेसचे चिमूर तालुकाध्यक्ष डॉ.विजय गावंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,प्रा.रविजी कांबळे,डॉ.प्रमोद गोंगले,केंद्रीय शिक्षिका सौ.सपनाताई कुंभारे,हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सौ.पद्मश्रीताई नागदेवते,दिप्तेशामखा पठाण,डॉ.सतीश वाघे,यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे,विकेश जनबंधू,रोशन गेडाम,आदी पदाधिकारी,कार्यकर्ते,उपासक व उपासिका याप्रसंगी मोठ्या उपस्थित होते.



