दहशतवाद आणि नक्षलवाद हे दोन वाद भारत स्वातंत्र्याच्या आधी नव्हते,स्वतंत्र भारतात हे दोन वाद निर्माण झाले, ज्यांना आज राक्षस म्हणून समजल्या जाते.काँग्रेस राजवटीत यांचा जन्म झाला, वाढही झाली आणि सरकारला त्रासदायक ठरली,त्यापेक्षा सामान्य जनता त्याची बळी ठरली.हिंसा भडकली,अजूनही ती विझत नाही.
दहशतवाद आणि नक्षलवाद हा काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे इथे पोसल्या गेला,काँग्रेसचे मुस्लिम धार्जिणे धोरणामुळे,संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या तत्वासं काँग्रेसनी महत्व दिल्यामुळे हे दोन वाद किंवा हे दोन राक्षस भारतीय जनतेचे जीव घेताहेत,अशी टीका भाजपने केली,आणि यांना मातीत गाडण्यासाठी आम्हाला निवडून द्या,आम्ही दहशतवादाचे आणि नक्षलवादाला मुळासकट उपटून टाकू,असे आश्वासन मतदारास देऊन भाजपा निवडून आला.
काँग्रेस,जनतदल,भाजपा या पक्षाचे सरकारे आली गेली,परत आली गेली,येतील जातील तरी हे दोन वाद का मिटत नाहीत ? हा मुख्य विषय चिंतनाचा आहे.पक्षीय सरकारे या प्रश्नाचा निकाल लावण्या ऐवजी राजकारणासाठी या दोन समस्यांचा,प्रश्नांचा वापरच केल्याचे दिसते,आणि यापुढील पक्षही हेच करतील,कारण सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी ती त्यांची गरज असते किंवा त्यांना तसे वाटते,पण आपण देशाचे नागरिक एक स्वतंत्र मतदार,सार्वभौम नागरिक म्हणून आणि हे दोन प्रश्न राजकार्त्यांच्या जीवनमरणाचे प्रस्न नसून आपल्या जीवनमरणाचे प्रस्न होऊन बसले आहेत,म्हणून एक सुद्न्य आणि जबाबदार नागरिक ,विचारवंत मतदार,म्हणून दहशतवाद आणि नक्षलवाद या दोन प्रश्नाचे गंभीरपणे चिंतन केले पाहिजे,आणि उपायही आपणच केला पाहिजे,जे आपल्याच हाती आहे, एक मतदार या नात्याने.
दहशतवाद का निर्माण झाला ? अर्थात कुणामुळे निर्माण झाला ? या वादात न पडता ( कारण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही ) वर्तमानात काय केले पाहिजे ? हे महत्वाचे.
प्रामाणिक चिंतन केले असता आपणास हे लक्षात येईल की, दहशतवादाचे मूळ हे द्वि राष्ट्राच्या संकल्पनेत आहे,आणि हा द्वि राष्ट्रवादाचे जनक हे सावरकर,गोळवलकर, हेगडेवार, जिना या व्यक्ती अखंड भारतातील होत्या,त्यांनीच भारताचे हिंदुआनी मुस्लिम राष्ट्र असे दोन भाग करण्याचा विचार केला.असा का केला ? तर हिंदुस्थानात ब्राह्मणांची सत्ता आणि पाकिस्तानात मुस्लिम ची सत्ता कायम राहण्यासाठीच.ह्या व्यक्ती एकाच देशाच्या एकाच ( काँग्रेस ) संघटनेच्या तरी यांनी हिंदू आणि मुस्लिम असा भेद करून द्वि राष्ट्रवादाचा सिद्धांत ( नव्हे कुविचार) मांडला,याचे कारण धर्मांधता नसून सत्तांधता होय.कारण कोणताही धर्माचे तत्व हे विभाजन नाही तर एकत्वच आहे,कारण सारेच धर्म हे आपण सारे एकाच ईश्वराचे अपत्य मानतात,दया , बंधुभाव, समता,क्षमा हे साऱ्याच धर्माची तत्वे आहेत( वैदिक ब्राम्हण धर्म वगळता ) असे असताना, जीना आणि सावरकरांना धर्माच्या नावाने भारताचे दोन तुकडे करून ( हिंदुस्तान पाकिस्तान ) ची मागणी इंग्रजांकडे करण्याची काय गरज होती ? गांधी नेहरू पटेल नी त्या मागणीस विरोध केला असता हिंदू मुस्लिम जनतेस भडकावून देऊन रक्ताचे पाट वाहण्याचे काय कारण होते ,? याचे कारण लोकांचे मुडदे पाडून सत्ता मिळवणे हेच होय, हीच यांनी निर्माण केलेली परंपरा अजूनही चालूच आहे.
खरे तर कोणत्याही धर्मात वर्चस्ववाद,वंशवाद,उच्चनीचता,स्त्रीपुरूष भेद,अस्पृश्यता नाही,परंतु ही विषमता ज्या ब्राम्हण धर्मात आहे,त्याच ब्राम्हण धर्माचे अनुकरण हिंदू,मुस्लिम,ख्रिचन करताहेत,डोळस धार्मिक न बनता धर्मांध बनतं आहे ही जनता,न्हवे हे सत्तलोभी वर्चस्ववादी मूठभर लोक सामान्य जनतेस धर्मांध बन उन त्यांचे त्यांना आपापसात लढवून त्यांचे मुडदे पडताहेत आणि राज करताहेत.हे मतदारांनी जाणले पाहिजे,जागृत झाले पाहिजे,यांचा हा धर्माचा खेळ संपविला पाहिजे.कारण दहशतवादाचे मूळ हे धर्मात नसून धर्मांधता यात आहे.समतेच्या तत्वाने सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने भाई भाई म्हणून बंधुभावाने राहू शकतात,हा पण इतिहास आहेच.अजूनही हिंदू मुस्लिम,शीख इसाई यांच्यात भांडणे नाहीतच,नसतातच सारेच जण एकमेकांच्या कामी पडतात,सहकार्य करतात.सहयोगी जीवन जगतात.शांतीमय जीवन जगण्यासाठी त्यांना कुठेच धर्म आडवा येत नाही.पण हे विभाजनकारी,राष्ट्रद्रोही, कुबुद्दीचे, दुष्टलोक ,दुर्जन यांनी देशाचा धर्माचा विश्वाचा सत्यानाश करून ठेवला आहे.याचे कारण लोकांची धर्माबद्दलची आस्था,श्रद्धा ,नव्हे अंधश्रध्दा होय.धर्मांधता होय.एकतर ही धर्मांधता लोकांच्या डोक्यातून कायम नष्ट केली पाहिजे,श्रद्धा आस्था म्हणून जात नसेल तर धर्मालाच बाद केले पाहिजे.कारण बुद्धिवादी , विदन्यवादी,विकासवादी , तर्कवादी या 21 व्या शतकात धर्म ही संकल्पना मानणे हे एक वेडेपणाचे,प्रतिगामित्वाचे लक्षण म्हणून समजल्या जात आहे.यातूनच दहशतवाद सारखे राक्षस जन्मास येऊन मानवी संहार करताहेत.
नक्षलवाद हा आर्थिक प्रश्न आहे, गैरबराबरी,गरीबी ,दारिद्र्य,वर्गीय समाज या विषयाशी संबंधित आहे,जो पर्यंत समाजवादी अर्थव्यवस्था इथे प्रस्थापित होणार नाही,वर्गावर्गातील अंतर कमी होत नाही,जमीनदार भांडवलदारं कडून होणारे शोषण,अमाप लूट,भ्रष्टाचार,महागाई,बेकारी कमी होणार नाही , तोपर्यंत नक्षलवाद संपणार नाहीच.बंदुकीच्या जोरावर हा प्रश्न सरकार सोडवू शकणार नाही,यासाठी समाजाभिमुख अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल.देशाच्या बजेटचा फायदा येथील जमीनदार आणि भांडवलदारांना न होऊ देता हे सरकारी बजेट,सरकारी पैसा मोठ्या प्रमाणात श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांकडून गरीब वर्गाकडे वळवावा लागेल,तेंव्हाच कुठे हा नक्षलवाद संपेल.हे काम सरकारचे आहे,ते त्याने संविधानाची अंमलबजावणी करून करू शकते.फक्त गरज आहे,राजकीय इच्छाशक्तीची.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 12 में 2025.
फोन : 9420912209.



