Home Social वंचित बहुजन आघाडी तर्फे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना भेट प्रकल्पाबाबत निवेदन…

वंचित बहुजन आघाडी तर्फे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांना भेट प्रकल्पाबाबत निवेदन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत.. 

साकोली : 2013 मध्ये जेव्हा केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल हे केंद्रात होते.त्यावेळेस हा भेल प्रकल्प सुरू झाला होता आणि प्रकल्पाचे काम सुधू झपाट्याने सुरू झाले होते. 

       असं वाटत होते की भंडारा जिल्ह्यामध्ये व विदर्भात एक महत्त्वाचकांसी प्रकल्प आपल्या भंडारा जिल्ह्यातील मुंडीपार येथे होत आहे.

         हे बघून लोकांना खुशी वाटली आणि त्याकरिता शेतकऱ्यांनी आपली 500 एकर जमीन तिथे गुंतवली.जेणेकरून आपल्या मुलाला एकाला तरी नोकरी मिळेल.

         परंतु 13 वर्षे लोटून गेले याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात जन आंदोलन सुद्धा करण्यात आले नाही,त्यामुळे बेकारी वाढलेली आहे.

         भंडारा जिल्ह्यात एवढे बेकारी जर दूर करायचे असेल तर असा एक महत्त्वाचा प्रकल्प या जिल्ह्यात सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून भेल प्रकल्प सुरू होत नसेल तर पर्यायी प्रकल्प सुरू व्हावा याकरिता खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा संघटक डी.जी.रंगारी यांनी निवेदन दिले आहे.

       आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या पूर्णपणे पाठिंबा असेल.आपण आंदोलन करावे.भेल प्रकल्प सुरू व्हायला हवे या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे