Home Maharashtra वाघांची भ्रमंती असलेल्या वनक्षेत्रात जिवावर उध्दार होवून मजूर करतात तेंदूपत्ता तोडण्याचे काम…...

वाघांची भ्रमंती असलेल्या वनक्षेत्रात जिवावर उध्दार होवून मजूर करतात तेंदूपत्ता तोडण्याचे काम… — काल विमल शेंडे ठरली वाघाची शिकार!..

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

मूल:-११ मे महिन्याच्या सुरुवातीपासून तालुक्यात तेंडुपत्ता संकलनास सुरुवात झाली.जंगलगच्या गावातील नागरिक आपली रोजी रोटी भागविण्यासाठी वाघाची भीती असतांना देखील तेंदुपत्ता संकलनासाठी जात असतात. 

      दिनांक १० मे २०२५ रोजी मुल तालुक्यातील नागाळा येथील महिला विमल बुधाजी शेंडे वय(६५) ही सकाळी ७ वाजता तेंदुपत्ता तोडण्यासाठी चिचपल्ली वन परिक्षेत्रातील नियत क्षेत्र पिंपळखुट,उपक्षेत्र महादवाडी कक्ष क्रमांक ५३७ मध्ये पत्ता तोडण्यासाठी गेली असता जंगलात झुडुपांमध्ये असलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन तिला जागीच ठार केले.                               

    घटनेची माहिती प्राप्त होताच चिचपल्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, प्राणीमित्र व पर्यावरण मित्र उमेशसिंह झिरे,तात्काळ घटनास्थळाला आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन भेट देऊन मोका पंचनामा करुन घेतला. 

     याप्रसंगी महादवादी क्षेत्र सहाय्यक प्रशांत खणके, केळझर क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पडवे,पिंपळखुट वनरक्षक गणेश दिवटे, वनरक्षक पवन येसांबरे, अनिल नालंमवाड, वनरक्षक मुल सुधीर ठाकूर,यांनी महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे शव विच्येदनासाठी पाठवला. 

    मृतकाचे कुटुंबियांना तात्काळ ३० हजार रुपये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे हस्ते देण्यात आले. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील महिला पुरुष नागरिकांनि हे नियत क्षेत्र वाघाचे वावर असल्याने कुठल्याही कामासाठी जंगलात जात असतांना सावधानता बाळगावी व आपल्या जीवाचे रक्षण आपणच करावे अशी विनंती सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी नागरिकांना केली आहे.